बांधकाम किमंतीत दरवाढ..स्टील, सिमेंटचे भाव गगनाला

बांधकाम व पायाभूत क्षेत्र हे भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीनंतर रोजगार उपलब्ध करून देणारे क्रमांक दोनचे क्षेत्र आहे.
Construction
Construction
Updated on


जळगाव : नोटाबंदीनंतर अडचणीत आलेल्या बांधकाम क्षेत्राला (Construction business
) गेल्या काही वर्षांत कुठलाही दिलासा मिळालेला नाही. त्यातच कोरोना (corona) व त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) या क्षेत्राला आणखीच फटका बसला. साठेबाजी व काळ्या बाजारामुळे स्टील (Steel), सिमेंटचे (Cement) दर गगनाला भिडले. पर्यायाने सद्य:स्थितीत बांधकामाची किंमत दर चौरस फुटामागे तीनशे रुपयांनी वाढले आहेत.
नोव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचा सर्वच क्षेत्रांवर कमी- अधिक प्रमाणात परिणाम झाला. मात्र, या निर्णयाने रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वाधिक प्रभावित केल्याचा दावा त्यावेळी आणि आताही केला जात आहे.

Construction
जळगावः पाचोऱ्यात मंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय खलबते


रिअल इस्टेटचे योगदान
बांधकाम व पायाभूत क्षेत्र हे भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीनंतर रोजगार उपलब्ध करून देणारे क्रमांक दोनचे क्षेत्र आहे. लहान-मोठ्या अडीचशेवर इंडस्ट्री या क्षेत्रावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात रोजगार निर्मितीत या क्षेत्राचे योगदान खूप आहे.

नोटाबंदीनंतर अडचणी कायम
नोटाबंदीचा परिणाम या क्षेत्रावर थेट झाला. तेव्हापासून आजपर्यंतच्या काळात टप्प्याटप्प्याने इतर समस्या उद्‌भवल्याने हे क्षेत्र वर येऊ शकले नाही. त्यातच गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आणि लॉकडाऊन लागल्यामुळे या क्षेत्राचा उतरता आलेख आणखीच खाली गेला.

सावरण्याचा प्रयत्न
वर्षभरापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली, दुसऱ्या लाटेतही पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली असली तरी त्यातून हे क्षेत्र सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान आवास योजना व अन्य पायाभूत सुविधांच्या कामांमुळे या क्षेत्राला संजीवनी मिळत असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे.

Construction
जळगावः तर..डिसेंबरअखेर कोरोनाची तिसरी लाट

दरवाढीने वाढली चिंता
या आशादायक चित्रात बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्य, वस्तूंचे दर गेल्या दोन वर्षांत कितीतरी प्रमाणात वाढल्यामुळे या क्षेत्रासमोरील चिंता पुन्हा वाढली आहे. सिमेंट, स्टीलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ केवळ साठेबाजी व काळ्या बाजाराने वाढल्याचे सांगण्यात येत आहे. ४० रुपये किलो असलेले स्टील (आसारी, लोखंड) गेल्या सहा- आठ महिन्यात ५० ते ६० व आता गेल्या पंधरवड्यात तर ७० रुपये किलोपर्यंत पोचले आहे. सिमेंटच्या एका थैलीचे दर दीड वर्षांत अडीचशेवरुन साडेतीनशेवर पोचले आहे. सध्या तर हे दर ३७५ रुपये प्रतिथैली असे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्सचे दर प्रकार, दर्जा, गुणवत्ता यानुसार वेगळे आहेत. त्या प्रत्येक स्वरूपात जवळपास २० ते ३० टक्के दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

मजुरीचे दर वाढले
लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर, कामगार त्यांच्या गावी परतले. गावापर्यंत पोचताना त्यांचे प्रचंड हाल झालेत. अखेरीस गावीच लहान-मोठे काम करुन ते स्थिरावले. त्यामुळे ६० टक्के मजूर परतलेच नाहीत. त्यामुळे स्थानिक मजूर, कामगारांकडून काम करून घेताना त्यांचाही रोज बऱ्यापैकी वाढला आहे. साध्या बांधकाम कामगाराला गेल्या वर्षापर्यंत ४०० ते ५०० रुपये रोज मिळत होता, तो आता ७०० रुपयांपर्यंत वाढला आहे. टाईल्स बसविणाऱ्यांचा रोज ७०० वरून १ हजार, अकराशेपर्यंत पोचला आहे.

तीनशे रुपये दरवाढ

या सर्व बाबींचा परिणाम एकूणच बांधकामाच्या किंमतीवर झाला असून बांधकामाची किंमत प्रति चौरसफूट तीनशे रुपये वाढल्याचे सांगितले जात आहे. स्वाभाविकत: सर्वसामान्य नागरिकाचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न महाग झाले आहे.

Construction
नंदुरबारः पंचायतराज समितीच्या नावे.. पैसा गोळा करण्याचा प्रकार

असे आहेत दर
प्रकार-----आधीचे-------- आताचे
सिमेंट----- २७५-२८०---- ३५०-३८५ (प्रतिथैली)
स्टील-----४०-४५---------६०-७० (प्रतिकिलो)
टाईल्सचे दर : २० ते ३० टक्के वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()