बांधकामे ‘लॉक’ तरीही.. वाळूउपसा जोमात

बांधकामे ‘लॉक’ तरीही... वाळूउपसा जोमात
valu upsa
valu upsavalu upsa
Updated on

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन (Jalgaon lockdown) सुरू असून, त्यात बांधकामेही ‘लॉक’ झाली आहेत. तरीही रोज हजारो ब्रास वाळूचा उपसा जोमात सुरू आहे. कामे बंद असतानाही प्रचंड उपसा होणारी वाळू कुठे जातेय, असा प्रश्‍न उपस्थित होत असून, तक्रारी, चौकशी आणि कारवाईचा धाक संपून माफियांची मुजोरी मात्र सुरूच आहे. (jalgaon-lockdown-construction--still-stop-but-valu-upsa-continue)

वाळूच्या अवैध उपशाबाबत (construction work still stop) जळगाव जिल्ह्याची प्रतिमा राज्यभरात डागाळलेली आहे. अनेक वर्षांपासून वाळूमाफियांच्या मुजोरीबाबत जळगाव जिल्हा बदनाम आहे. फडणवीस सरकारच्या (Maharashtra state fadnvis goverment) काळाता एकनाथ खडसे (eknath khadse) महसूलमंत्री असताना वाळूमाफियावरील ‘मोका’ची राज्यातील पहिली कारवाई जळगाव जिल्ह्यातच झाली होती. त्यानंतरही वाळूच्या अवैध उपसा, वाहतुकीचे प्रकार नियंत्रणात आलेले तर नाहीच, उलटपक्षी वाढले आहेत.

valu upsa
300 किमी अंतरावरून रसद; आणि कोविड सेंटर चालविणारे भारावले

कामेबंद, उपसा सुरूच

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात वाळू वाहतुकीवर नियंत्रण होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेत दोन महिन्यांपासून राज्यव्यापी लॉकडाउन लागू आहे. सर्व व्यवसाय, व्यापार ठप्प आहेत. ज्याठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा आहे तीच बांधकामे सुरू करण्याचे निर्देश आहेत. जळगाव शहर व जिल्ह्यात अशा बोटावर मोजण्याइतक्या साइट असून, उर्वरित बांधकामाच्या साइट्‌स मात्र बंद आहेत. तरीही वाळूउपसा जोमाने सुरू आहे. गिरणेतील रामेश्‍वरपासून थेट जिल्ह्याची हद्द असलेल्या चाळीसगाव तालुक्यापर्यंत अनेक ठिकाणी, बऱ्याच घाटांमधून रोज हजारो, लाखो ब्रास वाळू नदीपात्र ओरबाडून उपसली जात आहे.

डंपर, ट्रॅक्टरला नियम नाही?

लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांवर निर्बंध लागू आहेत. चारचाकीत दोघांना, मोठी चारचाकी असली, तर चारजण अशी मर्यादा आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन-चार हजारांचा जागीच दंड केला जातो. मग, वाळूपात्रातून अवैध नव्हे, तर थेट चोरीच होत असलेल्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

valu upsa
अमळनेर तालुक्यात ‘महसूल’चा धडाका..पून्हा वाळू ट्रॅक्टर जप्त !

राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम

वाळूच्या उपशाबाबत अनेक तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यासंबंधी चौकशाही सुरू आहेत. प्रशासन कारवाईलाही धजावते. मात्र, काही वर्षांत या विषयात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. काही ठेक्यांमध्ये तर स्वत: राजकीय पुढारीच सहभागी असल्याने जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे बोलले जाते.

सामान्यांना दंडुके

एकीकडे पोलिस सकाळी अकरानंतर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकींना थांबवून चौकशी करतात. योग्य कारण नसले, तर थेट दंडुके मारतात. दंडही आकारला जातो. पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या नागरिकांवरही कारवाई होते. मैदानावर खेळणाऱ्या मुलांच्या पालकांना वेठीस धरले जाते. मग, अवैध वाळूउपसा करणारी वाहने पोलिस, आरटीओंना दिसत नाहीत का.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()