जळगावातील अनाथ बालकांच्या मदतीसाठी एनजीओंचा पुढाकार

कोरोनाने अनाथ झालेल्या ३०० बालकांना मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जळगावातील अनाथ बालकांच्या मदतीसाठी एनजीओंचा पुढाकार
Updated on
Summary

दहा संस्था या बालकांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी शासनाच्या मदतीव्यतिरिक्त मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडे मांडला आहे.


जळगाव : कोरोनामुळे अनाथ झालेल्या (Orphan Children) बालकांना शासनाच्या योजनांचा (Government schemes) त्वरित लाभ अद्यापही मिळालेला नाही. अनाथ बालकांचे समुपदेशन सुरू आहे. या बालकांच्या मदतीसाठी आता जिल्ह्यातील तब्बल दहा सामाजिक संस्थांनी (एनजीओ) (Social organizations) पुढाकार घेत मदतीची तयारी दर्शविली आहे. लवकरच ‘एनजीओ’सोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांच्यासोबत बैठक होउन अनेक प्रकारची मदत जाहीर करण्यात येणार आहे.

जळगावातील अनाथ बालकांच्या मदतीसाठी एनजीओंचा पुढाकार
स्वत:ची पाठ थोपटून घेणारे ठाकरे सरकार-गिरीश महाजन

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना दोन महिने उलटल्यानंतरही मदत न मिळाल्याने ‘सकाळ’ने ५ ऑगस्टला ‘कोरोनाने अनाथ बालकांच्या मदतीचा केवळ फार्स’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे दहा संस्था या बालकांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी शासनाच्या मदतीव्यतिरिक्त मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडे मांडला आहे.

अशा प्रकारची होणार मदत :
सामाजिक संस्थांनी या मुलांच्या राहण्याची सोय, भोजनाचा, शिक्षणाचा खर्च, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्किल बेस प्रशिक्षण देण्याचा खर्च आदी खर्च करण्यास तयारी दर्शविली आहे.

या संस्थांचा आहे पुढाकार...

गार्डियन फाउंडेशन, केशवस्मृती प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भरारी फाउंडेशन, लोकसमन्वय प्रतिष्ठान, मौलाना आझाद फाउंडेशन, साने गुरुजी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, मनोबल फाउंडेशन आदींनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जळगावातील अनाथ बालकांच्या मदतीसाठी एनजीओंचा पुढाकार
ऑक्सिजनच्या गरजेविना ‘डेल्टा’चे सहाही रुग्ण बरे

कोरोनाने अनाथ झालेल्या ३०० बालकांना मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या मदतीव्यतिरिक्त दहा एनजीओंनी मदत करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव ठेवला आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.
- विजयसिंग परदेशी
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी


आकडे बोलतात...
दोन्ही पालक गमावलेले बालक : २०
एक पालक गमावलेले : ५२०
बालसंगोपन योजनेचे आदेश दिलेले बालक : २१५
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला : २८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.