जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू!

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येने २० चा आकडा ओलांडलेला नाही.
corona
coronacorona
Updated on



जळगाव : जिल्ह्यातून कोरोनाचा (corona) परतीचा प्रवास सुरू झाल्याचे चांगले संकेत समोर आले आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ( corona first-second wave) सर्वांत कमी म्हणजे अवघ्या सात नव्या रुग्णांची (Patients) शुक्रवारी (ता. ९) नोंद झाली. कोरोनाचा हा परतीचा प्रवास मानला जात आहे, तर दिवसभरात ३३ रुग्ण बरे झाले. पाच दिवसांपासून जिल्ह्यात मृत्यूची (Death) नोंद झाली नव्हती. मात्र, शुक्रवारी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. (corona in Jalgaon district on the way)

corona
बीएचआर प्रकरणः मालमत्ता व्यवहारांच्या तपासावर होणार ‘फोकस’


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येने २० चा आकडा ओलांडलेला नाही. दहा ते २०च्या दरम्यान दररोजची रुग्णसंख्या स्थिर आहे.

corona
जिल्हा बँक आघाडीवर, खरीप हंगामासाठी सरासरी ५० टक्के कर्ज वाटप

सर्वांत कमी रुग्णांची नोंद
गेल्या वर्षी २९ मार्चला जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आला. नंतर १७ एप्रिलपासून सातत्याने रुग्णवाढ होत गेली. मे २०२० पासून आजपर्यंत सर्वांत कमी रुग्णांची नोंद शुक्रवारी नोंदली गेली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अवघे सात रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ४३१ झाली.

corona
काळोख्या रात्रीचा थरार..कुटूंब गाढ झोपेत आणि मांजर-नागाची झुंज


...असे आढळले रुग्ण
जिल्ह्यात शुक्रवारी पाच हजार २३५ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. पैकी जळगाव शहरात अवघे दोन, भुसावळला एक, पाचोऱ्यात एक, जामनेर दोन व चाळीसगाव एक, असे रुग्ण आढळून आलेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()