जळगाव ः शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत मुदत असतानाही चौपदरीकरणाचे काम पूर्ण होता होईना, अशी स्थिती आहे. महामार्गाचे काम सुरू होऊन वर्षभरापेक्षा अधिक काळ उलटला आहे. दुसरा पावसाळा तोंडावर आहे. तरीही उड्डाणपुलासह चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.
शहरातून गेलेला महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. अनेक निरपराध नागरिकांचे अपघातात बळी गेले आहेत. या मुळेच महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. सहा महिन्यांची मुदत असताना वर्ष उलटले तरी विविध कारणांनी काम अद्यापही थंड बस्त्यात आहे. या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होतेच, शिवाय धूळही उडते. अनेक ठिकाणी काम सुरू असल्याबाबत किंवा वळण रस्ता असल्याबाबत फलक नसल्याने अनेक वाहनांचे अपघात झालेले आहेत.
अपघाताचे प्रमाण वाढले
महामार्गाच्या कामात प्रभाग कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी व्हेईकल अंडरपास (बोगदे) आहेत. या कामाला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी एकाही बोगद्याचे काम पूर्ण झालेले नाही. बायपास मार्गावरून जाताना रस्त्यावरील खडी, धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी बायपास आहे की समोरचा रस्ता आहे, याचे आकलन वाहनधारकांना होत नसल्याचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
जिल्हाधिकारी यांनी जानेवारी महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदार, महापालिका आयुक्त, महापालिकेचे अभियंता यांची बैठक घेऊन कामातील अडथळे दूर करण्याचे व कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने कामाला विलंब होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.