जळगाव : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ (‘Break the Chain’) अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, दोन आठवड्यांपासून दररोजची रुग्णवाढ (Increased morbidity) कमी होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातील स्थिती बघता चाचण्यांच्या तुलनेत आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत अर्थात पॉझिटिव्हिटीत (Positivity) राज्यातील (state) सर्वांत कमी दर जळगाव जिल्ह्याचा (Jalgaon district) आहे.
(corona patient positivity lowest rate state Jalgaon district)
दुसरीकडे खानदेशात नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीमध्ये अव्वल क्रमांक कायम असून, उत्तर महाराष्ट्रात नगरची स्थिती अजूनही बिकट आहे. नगरचा पॉझिटिव्हिटी दर राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक, राज्यव्यापी निर्बंध
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात राज्यात निर्बंध लागण्याआधीच जिल्ह्यात प्रशासनाने काही कठोर पावले उचलणे सुरू केले. मार्च महिन्यात जळगाव शहरात तीन महिन्यांचा जनता कर्फ्यू, नंतर संपूर्ण जिल्ह्यात तीन दिवसांचे संपूर्ण लॉकडाउन पाळण्यात आले. नंतर राज्य शासनानेच ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सर्वत्र कठोर निर्बंध लागू केले.
सकारात्मक परिणाम
या सर्व सामूहिक प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. मार्च महिन्यात देशभरात रुग्णवाढीत ‘टॉप टेन’मध्ये असलेल्या जळगाव जिल्ह्यात आता दोन आठवड्यांपासून रुग्णवाढ स्थिर झाली आहे. बरे होणारे रुग्णही वाढू लागल्याने सक्रिय रुग्ण कमी होत आहेत.
पॉझिटिव्हिटी घटली
एकीकडे रुग्णवाढ होत असताना प्रशासनाने चाचण्यांवर भर दिला. दिवसाला दोन-तीन हजारांच्या जागेवर आठ- दहा हजार चाचण्या होऊ लागल्या. त्यामुळे रुग्ण समोर आले व उपचार गतीने होऊ लागले. सोबतच संसर्गही कमी करण्यात यश आले. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून चाचण्यांच्या तुलनेत रोज आढळून येणारे रुग्ण कमी होत आहे. म्हणजेच पॉझिटिव्हिटी कमी झाली आहे.
आठवड्याची स्थिती
२९ एप्रिल ते ५ मे या आठवड्यात जळगाव जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी राज्यात सर्वांत कमी म्हणजे केवळ ८.८९ टक्के आढळून आली आहे. गेल्या सप्ताहात जिल्ह्यात ५९ हजार ६० चाचण्या करण्यात आल्या. पैकी पाच हजार २४८ रुग्ण आढळून आले. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात आठवडाभरात ११ हजार ८५० चाचण्यांमधून एक हजार ७२९ (१४.५९ टक्के), धुळे जिल्ह्यात १३ हजार ९२४ चाचण्यांमधून एक हजार ५७४ (११.३० टक्के) रुग्ण समोर आलेत. तर उत्तर महाराष्ट्रात नगर जिल्ह्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी तब्बल ४१.५२ टक्के आहे.
सप्ताहाची आकडेवारी अशी
जिल्हा ---- चाचण्या --- रुग्ण --- पॉझिटिव्हिटी
जळगाव --- ५९,०६०---५,२४८---८.८९ टक्के
नंदुरबार ---- ११,५८० --- १,७२९--- १४.५९ टक्के
धुळे ----- १३,९२४ --- १,५७४ ---- ११.३० टक्के
(corona Patient positivity lowest rate state Jalgaon district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.