कोरोनाची तिसरी लाट परतविण्यासाठी प्रशासन सज्ज-मंत्री पाटील

Jalgaon Corona News: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात ११ लाख कोविड लशीचे डोस देण्यात आले आहेत.
Corona Fight
Corona Fight
Updated on
Summary

जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णलयात ऑक्सिजन पाइपलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे.


जळगाव : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २०२१-२२ करिता ५३६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. मात्र, यंदा कोरोना (Corona) विषाणूमुळे राज्याच्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्यामुळे एकूण आराखड्याच्या ६० टक्के निधी उपलब्ध होणार असून, या निधीतून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यात येईल. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave)पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प (Production of oxygen Plant) उभारण्यात आले आहेत. काही प्रकल्प कार्यरत झाले असून, काहींचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली.

Corona Fight
या ५ गोष्टी अंमलात आणा..आणि भूतकाळातून बाहेर पडा

जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णलयात ऑक्सिजन पाइपलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७ हजार ४६१ खाटांचे व्यवस्थापन केले आहे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालरुग्ण कक्ष सुरू केला आहे. व्हेंटिलेटर व आयसीयू खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. शिवाय १४ लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात ११ लाख कोविड लशीचे डोस देण्यात आले आहेत. यात आठ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पहिला, तर अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

Corona Fight
ज्वारी खरेदीसाठी उन्मेश पाटलांचे भुजबळांना पत्र


पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन
कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. काही घरांमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला. आई-वडील गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २० असून, एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या ५१० एवढी आहे. या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. या कुटुंबांना प्राथमिक टप्प्यात अन्नधान्य, किराणा, कपडे, शालेय साहित्य, बी-बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()