जळगाव : कोरोना (corona) प्रतिबंधक लस (vaccine) घेतल्यानंतर रक्तदान करण्यावर मर्यादा होत्या. शासनाने लशीचा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करू नये, याबाबत दिशानिर्देश दिले होते. मात्र, आता त्या संदर्भात अभ्यासाअंती हा कालावधी घटवून आता लसीकरणानंतर १४ दिवसांनी रक्तदान (Blood donation) करणे शक्य होणार आहे. त्याबाबतचे नवे दिशानिर्देश (New guidelines) जारी करण्यात आले आहेत.
( corona vaccination fourteen days after blood donation)
रक्तदानाबाबत समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली असली तरी गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे रक्तदान चळवळीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत त्याचा तीव्रतेने अनुभव आला व रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवला.
लसीकरणाचा परिणाम
त्यातच १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक व तिसऱ्या टप्प्यात आधी सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील लोक व नंतर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देणे सुरू झाले. राज्यांनी पुढाकार घेतल्यानंतर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदानावर त्याचा परिणाम अधिक झाला.
२८ दिवसांचा कालावधी
लशीचा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करू नये, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून सुरवातीला आले. दोन डोसमधील कालावधीही २८ दिवसांचा असल्याने पहिला व नंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेणारे नागरिक तब्बल ५६ दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून देशभरात व पर्यायाने राज्यातही मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.
आता १४ दिवसांचे निर्देश
यादरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासानुसार लशीचा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनीही रक्तदान करणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने तसे नवे निर्देश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेनेही याबाबत सूचना व मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हा कालावधी घटल्याने आता ज्यांनी लस घेऊन १४ दिवस झाले त्यांनाही रक्तदान करणे शक्य असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.