कोरोनाची लाट सरली तरी अर्थचक्र मात्र रुळावर येईना!

Jalgaon Market News :जळगाव शहरात दाणाबाजार, मार्केट यार्ड या मोठ्या बाजारपेठा आहेत. कापडाची मोठी बाजारपेठ रेडिमेड कपड्यांची मोठी दुकाने आहेत.
Jalgaon Market
Jalgaon Market
Updated on
Summary

आता..ऑनलाइनवरच खरेदी होत असल्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. घरबसल्या हव्या त्या दर्जाची, रंगसंगतीत संबंधित माल उपलब्ध होत आहे.


Jalgaon Market News : जळगाव ः जळगावमध्ये कोरोनोचा (Corona) पहिला रुग्ण एप्रिल २०२० मध्ये आढळला. त्यानंतर तब्बल तीन महिने कडक लॉकडाउन (Lockdown) होता. आता मात्र सर्व अनलॉक (Unlock) झालेले असताना ग्रामीण भागातील ग्राहक (Customer) अद्याप शहरी भागात खरेदीसाठी आलेला नसल्याने अनलॉकपूर्वी असलेले अर्थचक्र व आता सुरू असलेले अर्थचक्र (Economic) यात पन्नास टक्के फरक पडला आहे.

Jalgaon Market
अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन


कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जून २०२० मध्ये अनलॉकच्या पहिल्या पर्वास सुरवात झाली. त्या काळात अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच वस्तू ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी त्यांच्या गावातच ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. ज्या वस्तू घेण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहक जळगाव शहरात येत होता. त्या वस्तू ग्राहकांना त्याच गावात आता मिळू लागल्या होत्या. त्या वस्तू ग्राहकांना त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी अबाधित ठेवले. याचा परिणाम थेट जळगाव शहरातील बाजारपेठेच्या उलाढालीवर झाला.


जळगाव शहरात दाणाबाजार, मार्केट यार्ड या मोठ्या बाजारपेठा आहेत. कापडाची मोठी बाजारपेठ रेडिमेड कपड्यांची मोठी दुकाने आहेत. शहरात घाऊक दराने वस्तू मिळतात. यामुळे ग्राहक ग्रामीण भागातून या बाजारपेठांत खरेदीसाठी कोरोना सुरू होण्याच्या अगोदर येत होता. कोरोनाच्या लाटेनंतर तो ग्राहक शहरात येत नसल्याचे व्यापारी सांगतात. ग्रामीण भागातील बहुतांश बागायतदार शेतकरी, जमीनदार, डॉक्टर, ठराविक वर्गातील ग्राहक शहरात खरेदीसाठी येत होते. कोरोनाने हा ग्राहक जळगाव शहरातील व्यापाऱ्यांपासून लांब नेल्याने रोजच्या उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे.

पारंपरिक ग्राहक राहिला नाही
पूर्वी किराणा, सोने चांदी, कपडे आदी वस्तू एकाच दुकानांतून वर्षानूवर्षे खरेदी होत. आजोबांकडून तीच पद्धत मुलगा, नंतर नातू अवलंबित असे. यामुळे त्या दुकानदाराचा पारंपरिक ग्राहक फिक्स असे. वर्षभरासाठी लागणाऱ्या वस्तू त्याच दुकानातून नेण्याची सवय होती. मालाची गुणवत्ता, दर याबाबत ग्राहक व मालकही तडजोड करीत नव्हता. मात्र, जसा काळ बदलला ही दुकाने संबंधितांच्या घराजवळच सुरू झाल्याने पारंपरिक ग्राहक आता राहिला नाही. ग्राहक मिळेल त्या ठिकाणावरून खरेदी करीत आहे.

Jalgaon Market
बारामतीकरांसाठी गुड न्यूज; वीकेंड लॉकडाऊन रद्द

ऑनलाइन शॉपिंगमुळे परिणाम
बहुतांश वस्तू आता ऑनलाइनवरच खरेदी होत असल्याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे. घरबसल्या हव्या त्या दर्जाची, रंगसंगतीत संबंधित माल उपलब्ध होत असल्याने व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे.

अशी आहे आकडेवारी..
* कोरोनापूर्वीची दैनंदिन उलाढाल- ५० ते ६० कोटी
* आताची दैनंदिन उलाढाल- २५ ते ३० कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()