एका बापाची मुलाला साथ..एका मुलाची बापा विरुद्ध साक्ष

एका बापाची मुलाला साथ..एका मुलाची बापा विरुद्ध साक्ष
jalgaon court
jalgaon courtjalgaon court
Updated on

जळगाव : ॲड. विद्या पाटील यांच्या माहेरच्यांना विद्युत करंट लागल्याचे सांगणाऱ्या भरतने मुलगा दुर्वेश घरी आल्यावर..आई चक्कर येवून पडल्याचे त्याला सांगितले हेाते. तर, घराबाहेर आजोबा लालसिंग रडत बसले होते. पत्नीची हत्त्या (Crime news) करणाऱ्या मुलास वाचवणारा लालसिंग एकीकडे.. तर, केवळ संशयामुळे पत्नीची हत्त्या (Murder case) करणाऱ्या बापाविरुद्ध साक्ष देणारा दुर्वेश असे दोन परस्पर विरोधी पात्र या खटल्याच्या (Jalgaon court) निकालात उलगडले गेले. (accompanying a father's son test evidence against a child's father)

jalgaon court
नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच

जामनेर येथील ॲड. राखी ऊर्फ विद्या पाटील (राजपुत) यांचा बेलखेड (ता.भुसावळ) डॉ. भरत लालसिंग पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना दुर्वेश ऊर्फ सोनू (वय १४) मुलगा असून घटनेच्या दिवशी (१३ जानेवारी २०१९) ॲड. विद्या पाटील यांना (सुटीच्या दिवशी) जळगाव न्यायालयात रिमांड कामी यायचे होते. तर पती भरत, सासरे लालसिंग असे, नंणदकडे वास्तुशांतीला जाणार होते. तत्पुर्वीच मुलगा दुर्वेश आजीसोबत तेथे गेलेला होता. कामानिमित्त सहकारी वकिलांचे जळगावहून येणाऱ्या फोन कॉल्सवरुन संशय घेणाऱ्या पतीने सुटीच्या दिवशी कशाला जाते; तिकडे रिकामे कामे करते म्हणत वाद घालून मारहाण केली. मारहाणी दरम्यान विद्या यांच्या तोंडावर उशी ठेवत त्यांची हत्त्या करण्यात आली. पती भरत पाटील व सासरे लालसिंग पाटील यांनी ॲड. विद्या यांना विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याचे त्यांच्या माहेरी कळवले होते. आत्याच्या घरून परतलेला मुलगा दुर्वेश याला मात्र, सांगतांना तुझ्या आईला चक्कर आले असून ती, बेशुद्ध झाली आहे. आपण दवाखान्यात नेतोय असे सांगत भरतने चालक विपुल पाटील यांना सोबत घेत मयत विद्या यांना भुसावळला डॉ. राहुल जावळे व नंतर ॲड. राजेश मानवदकर यांच्या रुग्णालयात नेले होते. डॉ. मानवदकरांनी तपासणीनंतर घटना पोलिसांना कळवण्याचे सांगितल्याने पती भरतने मृतदेह घेवून थेट मुळगाव बेलखेड (ता. भुसावळ) गाठले. असा संपुर्ण घटनाक्रम दुर्वेशने साक्ष देतांना न्यायालया समक्ष नोंदवला.

हत्येचे १३ अन्‌ शिक्षेचेही १३

ॲड. विद्या पाटील यांची हत्त्या १३ जानेवारी २०१९ रोजी झाली. दुसऱ्या दिवशी १४ तारखेला अंत्यसंस्कार झाले. संशयीत पती भरत पाटील यासं १४ जानेवारीला अटक होवून तो, कारागृहातच होता. तर सासरा लालसिंग श्रीपत जामिनावर सुटला होता. तपासाअंती दोषारोप दाखल होवून १५ फेब्रुवारीला कामकाजाला सुरवात होऊन महिन्याभरात ॲड. केतन ढाके यांनी सर्व साक्ष-पुरावे पुर्ण केले. दोषारोप निश्‍चीतीनंतर १३ मे रेाजी भरत पाटील यांस जन्मठेप तर त्याचा पिता लालसींग याला सश्रम कारवास न्यायालयाने ठोठावला.

एक बाप असाही..

गुन्ह्यात सहभागी मुलगा डॉ. भरतला वाचवण्यासाठी पिता म्हणुन लालसींग पाटील याने शक्य ते सर्व प्रयत्न केले; मात्र अपयशी ठरला. इकडे आईच्या हत्त्येने व्याकुळ मुलगा दुर्वेशने मांडलेली साक्ष पित्याच्या विरुद्ध असतांनाही तो, मात्र सत्य व न्यायाच्या बाजुने उभा राहिला. आरोपी मुलाला वाचवणारा अपयशी पिता..अन्‌ देाषी पित्याला शिक्षेपर्यंत पोचवणारा मुलगा अशी नात्यातील घुटमळ या खटल्या दरम्यान बघायला अनुभवायला मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()