जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात वादळामूळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरला पोहचण्यापूर्वी त्यांनी कोथळी येथील राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) यांच्या निवास्थानी खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची भेट घेतली. या भेटी प्रसंगी खडसेंच्या निवास्थानी लावलेले कमळाचे घड्याळ (Lotus clock) आणि त्यात असलेला एकनाथराव खडसे यांचा फोटो हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या कमळाच्या घड्याळ्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली.
(devendra-fadnavis-visited-eknath-khadses-house but lotus clock discussion everywhere)
जामनेर येथून मुक्ताईनगरकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज मंगळवारी दौरा सुरू झाला. मुक्ताईनगरात येण्यापूर्वी कोथळी गावातील खडसेंच्या निवास्थानी जाऊन त्यांनी खासदार रक्षा खडसेची सदिच्छा भेट घेतली. भाजपची सत्ता राज्यात असतांनाचे देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्यातील मतभेद सर्वश्रूत आहेत. तर मंत्री असताना खडसेंना अनेक आरोपांचा सामना करावा लागत मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मात्र खडसे आणि फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्योरोप चांगलेच रंगले.
त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतू आज खडसेंच्या घरी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आल्याने सर्वांचे भुवया उंचावल्या. त्याच सोबत कमळातील घड्याळात खडसेंचा फोटो पाहून चर्चेला अधिक उधान आले. अजून ही खडसेंच्या मनात भाजप बद्दल प्रेम असल्याचे चर्चा राजकीय वर्तूळात आज रंगली आहे.
भेटीपेक्षा चर्चा घड्याळाची
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या निवास्थानी जाऊन खासदार रक्षा खडसेंची भेट घेतली. त्याचवेळी माध्यमांची नजर कमळाच्या घडाळ्यावर पडली. त्या कमळाच्या घड्याळात एकनाथ खडसेंचा आहे. या घड्याळाचा व्हिडीओ वृत्तवाहिन्यावर दिसताच खडसे, फडणवीस यांच्यापेक्षा कमळाच्या 'त्या' घड्याळ्याची चर्चा अधिक रंगली होती.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत
विधानसभेत एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देणे, त्यानंतर रोहिणी खडसेंचा पराभव होणे. पराभवासाठी भाजपकडून रसद पुरावल्याचा आरोप करत खडसे यांनी शरद पवार यांचे नेतृत्व स्विकारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यापाल नियुक्त आमदारकीसाठी त्यांचे नाव पाठविलेले आहे. यावर मात्र अजून राज्यपालांनी निर्णय घेतलेला नसून राज्यापाल नियुक्त आमदारांचे प्रकरण प्रलंबीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.