जळगाव: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या युती शासनाने केलेल्या कर्जमाफी पेक्षा आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फायदेशीर ठरली आहे,त्यामुळे फडणवीस यानी आघाडी सरकारच्या ( Mahavikas Aghadi government) कर्जमाफी चे अभिनंदन करावे असे आवाहन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. (Jalgaon Latest news in Marathi)
जळगाव (Jalgaon News Today Marathi) येथे पोलिस दलासाठी नवीन वाहने वितरित करण्यात आली.यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात पूरग्रस्तांना मदत तसेच शेती कर्जमाफी करण्याच्या बाबतीत उल्लेख केला आहे. याबतीत पत्रकारांनी प्रस्न विचारला असता,मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पूरग्रस्तांना मागची मदत एनडीआरफ निकषा पेक्षा अधिक होती, त्यावेळी दिलेल्या मदती पेक्षा या वेळी देण्यात येणारी मदत निश्चित वेगळी आहे.या शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात दिलेली कर्जमाफी पेक्षा आता आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फायदेशीर आहे. योगायोगाने त्या काळात आपण मंत्री होतो,या सरकारमध्ये मंत्री आहे.मागच्या व कर्जमाफीत मोठा फरक आहे.
आघाडी सरकारमूळे तक्रारींचा निपटारा
मागची कर्जमाफी दीड वर्ष चालली ही कर्जमाफी लगेच झाली शेतकऱ्यांच्या खात्यात दीड लाख रुपये पडले,मागची कर्जमाफी अधिक जटिल होती, अंगठ्या चे ठसे मिळत नाही अश्या अनेक तक्रारी होत्या,आघाडी सरकारची कर्जमाफी सरळ झाली त्यामुळे फडणवीस यानी आघाडी सरकारच्या कर्जमाफी चे अभिनंदन केले पाहिजे .
जिल्हा बँकेचे कौतुक
जळगाव जिल्हा बँकेने यावेळी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने कर्ज दिले आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.