चोपडा बाजार समितीच्या सभापतिपदी देशमुख बिनविरोध

चोपडा बाजार समितीच्या सभापतिपदी देशमुख बिनविरोध
Chopda Bazar Samiti
Chopda Bazar SamitiChopda Bazar Samiti
Updated on

चोपडा (जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी दिनकर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. (jalgaon-Dinkar-Deshmukh-unopposed-as-chairman-of-Chopda-Bazar-Samiti)

मौखिक करारानुसार कांतीलाल गणपत पाटील यांनी २२ जूनला जिल्हा निबंधक जळगाव यांच्याकडे सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे मंगळवारी (ता. २९) बाजार समितीच्या सभागृहात सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक उपनिबंधक के. पी. पाटील यांनी काम पाहिले.

Chopda Bazar Samiti
लोकनियुक्त सरपंचांचा पायउतार; ग्रामपंचायतीत ‘अविश्वास’ ठराव पारित

बाजार समितीच्‍या सभापती निवडणूकीला सकाळी अकराला निवड प्रक्रियेस सुरवात झाली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत साडेअकरापर्यंत होती. यात सभापतिपदासाठी अडावद येथील राष्ट्रवादीचे दिनकर पंडितराव देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक के. पी. पाटील यांनी बाजार समिती सभागृहात जाहीर केले. सभापतिपदासाठी देशमुख यांना सूचक कांतीलाल पाटील तर अनुमोदक म्हणून प्रल्हाद पाटील होते. निवडीनंतर सभापती देशमुख यांचा सत्कार चोसाका माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, संचालक सुनील जैन, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, उपसभापती नंदकिशोर पाटील, प्रदीप पाटील, बाळासाहेब पाटील, मगन बाविस्कर यांनी केला.

निवड प्रक्रियेवेळी १८ पैकी १५ संचालक उपस्थित होते. यात उपसभापती नंदकिशोर पाटील, माजी सभापती कांतीलाल पाटील, संचालक गोपाळ पाटील, धनंजय पाटील, मुरलीधर बाविस्कर, रवींद्र पवार, प्रल्हाद पाटील, भरत पाटील, अरुण पाटील, संगीता पाटील, नारायण पाटील, रामलाल कंखरे, माणिकचंद महाजन, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

अनुपस्थित संचालक

सभापती निवडीच्या वेळेस ३ संचालक अनुपस्थित होते. यात माजी सभापती जगन्नाथ पाटील, संचालक घनश्याम अग्रवाल, मनीषा सोनवणे यांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब महाले, बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे, जितेंद्र देशमुख यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()