जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यात २६३ व्यक्तींनी अपघातात गमावला जीव

Jalgaon Accident News : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Accident
Accident
Updated on
Summary

जानेवारी ते जून २०२० या कालावधीत ३२७ अपघातांची नोंद आहे. त्यात २१३ व्यक्तींचा मृत्यू झाला असून २७२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत.


जळगाव ः जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत ४०६ अपघात (Accident) झाले असून यात, तब्बल २६३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती आहे. १९२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority) प्रतितास ८० किलोमीटर ही आदर्श वेगमर्यादा घालून दिलेली आहे. त्यानुसार अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी या वेगमर्यादेचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी येथे दिल्या आहेत.

Accident
तीन ‘हतनूर’ धरण भरतील इतके पाणी गेले वाहून!


अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासंदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजपूत, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक देविदास कुणगर आदी उपस्थित होते.

Accident
हाॅट बलून राईडचा आनंद घ्यायचायं, तर..या शहरांना नक्की भेट द्या


जानेवारी ते जून २०२० या कालावधीत ३२७ अपघातांची नोंद आहे. त्यात २१३ व्यक्तींचा मृत्यू झाला असून २७२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. सर्वाधिक अपघात हे चाळीसगाव ग्रामीण, जळगाव एमआयडीसी, पाचोरा, अमळनेर, भुसावळ, चोपडा व नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीत झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोही यांनी बैठकीत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.