जळगाव : कोरोनाबाधित (corona) रुग्णांवर (patient) उपचारासाठी (Treatment) मंगळवारी (ता. ११) जिल्ह्यातील ८२ खासगी हॉस्पिटल्सना (Private hospitals) ५१७ रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या (Remedivir injection) व्हायल्सचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. ( distribution five hundred seventeen remedivir injection jalgaon district)
आज जिल्ह्याला ५१७ रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या असून, त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणाऱ्या ८२ खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन (oxygen), आयसीयू (ICU), व्हेंटिलेटर बेडच्या (Ventilator bed) संख्येनुसार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महापालिका, पालिका, नगर परिषदा व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरित करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे २४ बाय ७ रेमडेसिव्हिर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिव्हिरचा काळा बाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हिरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महापालिका, पालिका प्रशासन व नगरपंचायतसह आयुक्त, औषध प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
इंजेक्शन वाटपाची लिस्ट
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये, याकरिता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात येऊन केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
( distribution five hundred seventeen remedivir injection in jalgaon district)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.