मागील निवडणुका झाल्या त्यावेळी खडसे भारतीय जनता पक्षात होते.त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते माजी मंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांनी मुंबई त एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेतली. जिल्हा बँक निवडणुकीत (District Bank Election) सर्वपक्षीय पॅनल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुका लवकरच होत आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता तयारी सुरू झाली आहे.जळगाव जिल्हा बॅंकेवर एकनाथ खडसे यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे अध्यक्ष आहेत. मागील निवडणुका झाल्या त्यावेळी खडसे भारतीय जनता पक्षात होते.त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते.या वेळी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.यावेळी ही सर्वपक्षीय पॅनल करण्याबाबत विचार सुरू आहे.
खडसेंच्या निवास्थानी भेट
या संदर्भात भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.सतीष पाटील व गुलाबराव देवकर मुंबई त खडसे यांच्या निवासस्थानी भेट घेण्यास गेले होते.या बाबत डॉ.सतीष पाटील यांनी सांगितले की,आम्ही मुंबईत खडसे यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.तसेच जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा केली.यात पुन्हा पक्षीय पॅनल करण्यावर चर्चा झाली.खडसे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. जळगाव येथे आल्यानंतर त्या बाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने डॉ. पाटील यांनी सांगितले.
महाजन-खडसे एकत्र येणार काय?
जळगाव जिल्हा बँकेत सद्या असलेल्या सर्वपक्षीय पॅनल मध्ये भाजपचे गिरीश महाजन,आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे,हे संचालक आहेत. सद्या एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत.मात्र सहकारात पक्षीय वाद बाजूला ठेवून ते एकत्र येणार काय? या कडेच आता लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.