जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु !

Jalgaon Corona News: जळगाव जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. सोबतच सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत.
corona
corona
Updated on
Summary

जळगाव जिल्ह्यात २८ मार्च २०२०ला पहिला कोरोना बाधित आढळून आला. शहरातील हा रुग्ण खानदेशातील पहिला रुग्णही ठरला.



जळगाव : तीन आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाच्या (corona) नव्या रुग्णांची संख्या (Corona Patient) दहाच्या आत असताना पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वांत कमी म्हणजे अवघी १ ही संख्या सोमवारी नोंदली गेली. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील (Corona first waves) प्रारंभापासून म्हणजे एप्रिल २०२० ते आजपर्यंतच्या १६ महिन्यांत असे पहिल्यांदाच घडून आले.

corona
महाड पुरग्रस्तांना खानदेशी तरुणांईने दिला मदतीचा हात


आज नोंदली गेलेली ही संख्या जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे संकेत देत असली तरी बाजारपेठेवरील निर्बंध शिथिल होत असताना आता सर्वांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात २८ मार्च २०२०ला पहिला कोरोना बाधित आढळून आला. शहरातील हा रुग्ण खानदेशातील पहिला रुग्णही ठरला. नंतर लगेच ३० तारखेस दुसरा रुग्ण जळगाव शहरातूनच समोर आला. नंतर १७ एप्रिलपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत जाऊन पहिल्या व आता दुसऱ्या लाटेपर्यंत तो कायम आहे. दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोकाही कायम आहे.

सर्वांत कमी संख्या
अर्थात, या दोन्ही लाटांमध्ये प्रभावी उपाययोजनांमुळे दुसऱ्या लाटेतील स्थिती चांगली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच सर्वांत कमी रुग्णसंख्या सोमवारी नोंदली गेली. चोपडा तालुक्यातील एकमेव रुग्ण वगळता सोमवारी जळगाव शहरासह अन्य सर्व तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. तर दिवसभरात ९ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात ९८. १४ टक्के झाले आहे. सलग अठराव्या दिवशी जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही.

corona
खानदेशची केळी आता राज भवनात

कोरोनाचा परतीचा प्रवास

महिनाभरापासून दररोजची रुग्णसंख्या दहाच्या आत आणि सलग अठराव्या दिवशी एकही मृत्यू नाही. शिवाय केवळ एकमेव नवा रुग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे बोलले जात आहे.


सक्रिय रुग्ण सत्तरच्या आत
जळगाव जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. सोबतच सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत. सद्य:स्थितीत सक्रिय रुग्णसंख्या अवघी ६९ असून त्यात सर्वाधिक ३९ रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()