जळगाव जिल्ह्यातील धरणात वीस टक्के कमी साठा

Jalgaon Dam News : उडीद, मुगाचे पिके वाया गेल्यानंतर आता कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तुर, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.
Dam
Dam
Updated on


जळगाव ः जिल्ह्यात यंदाही पावसाने (Rain) ओढ दिल्याचे चित्र आहे. ऑगस्ट पूर्ण होत आला तरी केवळ ५७ टक्के पाऊस झाला आहे. तर धरणातील (Dam) पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के कमी जलसाठा (Water storage) आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र स्वरूपाची जाणवेल, असा अंदाज भुगर्भतज्ञ (Geologist) व्यक्त करीत आहेत.

Dam
जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प; हॉलमार्क सक्ती विरोधात बंद


यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस शेतकऱ्यांसह सर्वानाच चकवा देत आहे. यंदा दमदार पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र तो पहिल्या महिन्यातच फोल ठरला. पंधरा जूननंतर खऱ्या अर्थाने पाउस सुरू झाला. जुलैमध्ये पुन्हा पंधरा दिवस पावसाने ओढ दिली. यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले होते. मात्र जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पिकांना जिवदान मिळाले. परत जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते १६ ऑगस्टपर्यंत पावसाने ओढ दिली. पावसाचे वातावरण तयार होत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. अखेर १७ ऑगस्टपासून पाऊस बऱ्यापैकी सुरू झाला आहे. असे असले तरी जोरदार पावसाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. उडीद, मुगाचे पिके वाया गेल्यानंतर आता कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तुर, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र तोही चांगला पाऊस आगामी काळात झाला तर. यामुळे अजून दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.

Dam
बहिणीने राखी बांधली पाहुणचार केला..आणि वाटेत भावाचा अपघात झाला



जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा असा

धरण--यंदाचा साठा-गतवर्षीचा साठा

हतनूर--१९.८०--२०.१६ टक्के
गिरणा--४४.३७--६३.६६
वाघूर--६१.८१--९३.०१
एकूण----४२.४९--५९.९६

अभोरा--१००--१००
मंगरूळ-१००--१००
सुकी--९२.२८--१००
अग्नावती--०.००--१००
हिवरा--४७.१२--१००
तोंडापूर--४४.९८--१००
मन्याड--८१.७१--१००
भोकरबारी--१३.५३--१२.१६
मोर--५५.२०--६६.३९
बहुळा--१८.३०--८६.३४
अंजनी--२९.०३--७२.८६
गुळ--२९.४७--७६.४३
बोरी--८६.९५--९४.४१
एकूण---६३.८०--८९.१३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()