कुऱ्हा काकोडा (ता.मुक्ताईनगर) ः तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा (Dolarkheda Forest Tiger) नियत क्षेत्रामधील पट्टेदार वाघ सुदृढ असून सुस्थितीत असून आपल्या नेहमीच्या शैलीत जंगलात वावरत आहे असे जळगाव वनविभागाचे (Jalgaon Forest Department) उपवनसंरक्षक विवेक होसींग (Forest Conservator Vivek Hosing) यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलतांना उपवनसंरक्षक होसींग यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा नियतक्षेत्रामध्ये पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत असून लंगडत आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही दोन तीन तुकड्या तयार करून जखमी व लंगड्या स्थितीत असलेल्या वाघाला शोधण्यासाठी शोधमोहीम केली.
२० ट्रॅप कॅमेरे लावून शोध
जंगलामध्ये ठिकठिकाणी तब्बल विस ट्रॅप कॅमेरे लावले मात्र वाघ दिसून आला नाही परंतु दिनांक १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दोन ट्रॅप कॅमेऱ्यात वेगवेगळ्या पट्टेदार वाघ दिसून आला आणि त्याच्या पाऊलाचे ठसे सुध्दा आढळून त्यानुसार पट्टेदार वाघ एकदम सुदृढ असून ठणठणीत आहे तो त्याच्या क्षेत्रात नेहमीप्रमाणे वावरत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
नागरिकांंच्या सह शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये तसेच वेगवेगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नये मात्र जंगला लगतच्या शेतामध्ये जाताना शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री जाणे टाळावे एकटे जाऊ नये चार पाच लोकांच्या समुहाने जावे हातात लाठी काठी बाळगावी आणि कुठे काही दिसल्यास वनविभागाला माहिती द्यावी व सहकार्य करावे असे ही जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसींग यांनी सांगितले या भागात कायमस्वरूपी गस्त घालण्यात येईल. फिरत्या पथकाचे वनाधिकारी तथा वढोदा वनक्षेत्राचे प्रभारी वनक्षेत्रपाल बि.के. थोरात, वनपाल पि.टी.पाटील, वनरक्षक व कर्मचारी वर्गाची लक्ष ठेवून आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.