जळगाव ः शहरासह तालुक्यातील रेशनकार्डधारकांना (Ration card) धान्यवाटप न करणे, कमी देणे, धान्यात तफावतसह पथक तपासणीला आल्यानंतर दुकान बंद करून जाणे, असे दोष आढळून आलेल्या जळगाव शहरासह तालुक्यातील आठ रेशन दुकानांचा (Ration shops) परवाना (License) निलंबित, एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.
वाहतूक ठेकेदाराशी संगनमत करून जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून धान्याचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव व नांदेड जिल्ह्यात २०१८ मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदाराशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार पुरवठा राज्यमंत्री डॉ. कदम यांच्याकडे करण्यात आली आहे. त्या तक्रारीची पुरवठा राज्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना १८ ऑगस्टला मंत्रालयात बैठकीसाठी बोलविले होते. धान्याच्या काळ्याबाजाराबाबत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाच्या पथकांनी जळगाव तालुक्यात स्वस्त धान्याच्या दुकानांची तपासणी केली. त्यात वरील दोष आढळून आले.
परवाने निलंबित दुकाने अशी
तांबापुरातील वाहेद बिस्मिल्ला खान यांचे दुकान क्रमांक ७२, भिका सोनवणे यांचे मेहरूणमधील स्वस्त धान्य दुकान, मिलाफचंद जैन यांचे शिवाजीनगरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५, प्रकाश भंगाळे यांचे ईश्वर कॉलनीतील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३८/३, कैलास कथुरिया यांचे नवनाथ दारकुंडे यांच्या शिवाजीनगर स्वस्त धान्य दुकान क्रमांक २/१, अध्यक्ष अपना ग्राहक भंडार मेहरूण यांचे दुकान क्रमांक २, अनिल पाटील यांचे समतानगरातील दुकान क्रमांक ७५.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.