दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात तीव्र उन्हाळ्यातही केवळ एकच टँकर

नागरिकांनी स्वतःहून झाडे लावली. शोषखड्डे केले. जलपुनर्भरणाचे प्रयोग राबविले.
water tanker
water tankerwater tanker
Updated on



जळगाव ः कडक उन्हाळ्यात (Summer) गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात दोनशेच्या वर टॅंकर (Water tanker) सुरू होते. मात्र गेल्या वर्षापासून सलग दुसऱ्याही वर्षी जादा संख्येने टँकरने पाणीपुरवठ्याची (Water supply) वेळ जिल्हा प्रशासनावर आली नाही. यंदा केवळ एकच टँकर मडगाव (ता. भडगाव) येथे सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) सूत्रांनी दिली.


(Jalgaon district even hot summer only one tanker started)

water tanker
जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !

जिल्ह्यात २०१९, २०२० मध्ये चांगला पाऊस झाला. परिणामतः २०२०, २०२१ मध्ये दोन्ही वर्षांत अखेरपर्यंत गावांना पाणीटंचाईची झळ पोचली नाही. नागरिकांनी स्वतःहून झाडे लावली. शोषखड्डे केले. जलपुनर्भरणाचे प्रयोग राबविले. शेतकऱ्यांनी शेततळे केले. पावसाचे पाणी शेतातच जिरविले. याचा परिणाम म्हणून जमिनीतील पाणीपातळी उंचावली. ते जून महिन्यापर्यंत टिकली. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई नाही.

दोन वर्षापूर्वी होती भिषण परिस्थीती

दोन वर्षांपूर्वी पाण्यासाठी हंडा मोर्चे, रात्ररात्र जागरणे, पाण्यासाठी लांबवरून बैलगाडीने, सायकलीवर पाणी आणणाऱ्या महिला, माणसे असे चित्र होते. मात्र निसर्गाच्या कृपने चांगला पाऊस झाल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत नसल्याचे चित्र सध्या आहे.

टँकरचे प्रस्ताव नाही
जिल्ह्यात मडगाव वगळता इतर ठिकाणी पाणी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीने दिलेले नाही. तरीही उपाय म्हणून २३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

water tanker
शेतकऱ्यांना आता..अनूदानावर मिळणार बियाणे !

सध्या मडगावला एकच पाण्याचा टँकर सुरू आहे. गत वर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी अजूनही कायम आहे. असे असले तर प्रांताधिकाऱ्यांना टँकर सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जर टँकरची गरज भासली तर ते संबंधित गावांना टँकर सुरू करू शकतात.
-राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी

(Jalgaon district even hot summer only one tanker started)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.