ई-पीकपाहणी ॲपद्वारे शेतकरी हायटेक

जिल्ह्यात सातबारा उताऱ्या‍वर दर वर्षी सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांमार्फत केली जात होती.
E-crop inspection
E-crop inspection
Updated on

जळगाव ः जिल्ह्यात एक हजार ५०३ महसुली गावांत मोठे कृषी (Agriculture) क्षेत्र असून, आठ ‘अ’नुसार सहा लाख ४५ हजारांहून अधिक शेतकरी खातेदार आहेत. शेतकऱ्यांनी (Farmers) त्यांच्या शेतातील पीक पेरणीची (Crop Sowing) माहिती स्वतः भरावी व त्यातून अचूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावरून १५ ऑगस्टपासून ई-पीकपाहणी (E-crop inspection) प्रबोधन सप्ताह सुरू आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एक हजार ३३४ गावांतील १२ हजार ९२५ शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी ॲपद्वारे त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी केली आहे.

E-crop inspection
वादग्रस्त विधानावरून जळगावात शायर मूनव्वर राणांचा पुतळा जाळला


जिल्ह्यात सातबारा उताऱ्या‍वर दर वर्षी सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. मात्र, या वर्षापासून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती स्वतः भरावी. त्यातून अचूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावरून १५ ऑगस्टपासून ई-पीकपाहणी प्रबोधन सप्ताह सुरू असून, तलाठी, कृषी कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमामुळे पीकपेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. पीकपेरणी अहवाल दिलेल्या लिंकवरून ई-पीकपेरणी अहवाल ॲप डाउनलोड केल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांची माहिती शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी केल्यानंतर गट व खाते नंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय माहिती, पिकांचे छायाचित्र काढून ते अपलोड करावे लागणार आहे. ही मोहीम अधिक जलद व सुलभ व्हावी, यासाठी कृषी, महसूल विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. या अहवालानुसार सात-बारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी केल्या जाणार आहेत.

E-crop inspection
‘गिरणा’त ४२ टक्के जलसाठा; तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम


शासनाच्या ई-पीकपाहणी ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना पिकांची अचूक माहिती देणे सुलभ होणार आहे. पीककर्ज, पीकविमा, तसेच नैसर्गिक आपत्तीत पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठीही प्रशासनाला सोयीचे होणार आहे.
-शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी, महसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.