जळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या पावसाने (Rain) गेल्या शनिवारपासून झोडपणे सुरू केले आहे. सततच्या पावसाने (Heavy Rain) नद्या, नाले पुन्हा खळाळू लागले आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३८.९ मिलिमीटर पाऊस झाला. रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा भडगाव व बोदवड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अमळनेर तालुक्यात सर्वांत जास्त ६३.७ मिमी, तर चाळीसगाव तालुक्यात सर्वांत कमी ७.८ मिमी पावसाची नोंद आहे. दरम्यान, आज दिवसभर पावसाने उघडीप देत सूर्यप्रकाश पडल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) दिलासा व्यक्त होत आहे.
नदी-नाल्यांमधील पाणीपातळीत वाढ झाली असून, विसर्ग कमी झालेल्या बहुतांश मध्यम, मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात येवून, विसर्गात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांत लावलेल्या दमदार हजेरीमुळे नदी-नाल्यांमधील कमी झालेल्या प्रवाहात वाढ झाली आहे. यामुळे मध्यम प्रकल्पांपैकी बहुळा प्रकल्पाचे नऊ दरवाजे दहा सेमींने उघडून तीन हजार ९२ क्यूसेक पाणी बाहेर सोडले जात आहे.
बोरी प्रकल्पाचे तीन दरवाजे १० मीटरने उघडले असून, ९०० क्यूसेक पाणी, मन्याड ४१७.५० क्यूसेक, मोर प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून १७३.७४ क्यूसेक, मंगरूळ १३८.०८ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर प्रकल्पाचे आठ दरवाजे तीन मीटरने उघडून ६४ हजार ९८०, गिरणा प्रकल्पाचे दोन गेट एक फुटाने उघडून दोन हजार ४७६ क्यूसेक, तर वाघूरचे चार दरवाज्यांतून १६९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
ज्वारी काळी पडली
अगोदरच अतिपावसामुळे कपाशी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात परतीच्या पावसामुळे कापणीस आलेली ज्वारी काळी पडली आहे. एकूणच खरिपातील एकमेव ज्वारी आणि मका उत्पादनाचा हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऑगस्ट- सप्टेंबरअखेर बाजरीचे उत्पादन कापणी होऊन पडले आहे. तर ज्वारीचे पीक कापणीस आले असून, सतत सुरू असलेल्या पावसामुळे ज्वारीची कणसे काळी पडली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.