जळगाव : जिल्ह्यात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) कापूस आणि मका पिकाचे (Crop) सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने ( Jalgaon District Agriculture Department) वर्तविला आहे. तब्बल तीन लाख ७१ हजार २५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, चार लाख ८५ हजार ८९ शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला पाठविला आहे.
जिल्ह्यात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सर्वत्र अतिवृष्टी झाली. यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
महिनाभरात तिसऱ्यांदा अतिवृष्टी
गेल्या तीन आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत तीनदा अतिवृष्टी झाली, तर गेल्या चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला. उभ्या कापसाच्या शेतांमध्ये अक्षरश: पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असून, कृषी विभागाने प्राथमिक
अंदाज वर्तविला आहे.
४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन लाख ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात कापूस पिकाचे सर्वाधिक कोरडवाहू ४१ हजार ६२९, तर बागायती दोन लाख ५५ हजार २३ हेक्टर, मका ३३ हजार ४५२, ज्वारी ८ हजार १९१, सोयाबीन ८ हजार ३६२, उडीद- मूग ३७६२, बाजारी
६१७०, भाजीपाला ७८५०, ऊस ६६७, केळी ६८८, फळपिके २९०१, तूर २६४, भुईमूग ५११, तीळ २०४, सुर्यफूल २४.६, पपई ११९ हेक्टर, असे नुकसान झाले आहे.
अमळनेरला सर्वाधिक फटका
जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका अमळनेर तालुक्याला बसला असून, ५२ हजार ३२५ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. जळगाव तालुका २५ हजार ३२ हेक्टर, भुसावळ ४४, बोदवड ११ हजार ५०, यावल ९७५८, रावेर ८ हजार ९६७, मुक्ताईनगर १२ हजार ६०८, एरंडोल ३५ हजार ५९, धरणगाव १३ हजार ३००, पारोळा ४४ हजार ७२६, चोपडा ३१ हजार ५१७, चाळीसगाव ४८ हजार २१९, जामनेर ३१ हजार १२५, पाचोरा ३५ हजार ४४४, भडगाव १२ हजार असे एकूण ३ लाख ७१ हजार २५५ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
पावणे पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. निसर्गाच्या माऱ्यापुढे बळीराजा हतबल झाला असून, त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पंचनामे सुरू केले असले, तरी शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी भरीव मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जळगाव तालुक्यातील २८ हजार ९७ शेतकरी, भुसावळ ६२, बोदवड १७ हजार २५०, यावल ११ हजार ३००, रावेर ११ हजार ६८६, मुक्ताईनगर ११ हजार २००, अमळनेर ७७ हजार ७७६, एरंडोल २९ हजार ५००, धरणगाव १६ हजार ५००, पारोळा ५४ हजार २६६, चोपडा ४३ हजार १२७, चाळीसगाव ८४ हजार ८६७, जामनेर ३८ हजार ८९०, पाचोरा ४२ हजार ५६८, भडगाव १८ हजार असे एकूण चार लाख ८५ हजार ८९ शेतकरी बाधित झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.