सावदा, यावल, कुंभारखेडा, आचेगावला अवैध सावकारांवर छापे

Illegal lenders News : घरावर छापे टाकून सावकारी संदर्भात कागदपत्रांची तपासणी करून दिवसभर ही कारवाई सुरू होती.
Illegal lenders
Illegal lenders
Updated on


जळगाव : येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे (District Deputy Registrar's Office) अवैध सावकारांविरोधात (Illegal lenders) प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. १७) सावदा, यावल, कुंभारखेडा, आचेगाव परिसरात एकाच वेळी छापे (Raid) टाकण्यात आले. आठ पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून संबंधितांच्या घरांकडून आक्षेपार्ह कागदपत्रे जमा केली आहेत. यामुळे परिसरातील अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. छापे टाकताना सावदा, वरणगाव, यावल पोलिसांचे पथकही सोबत होते.

Illegal lenders
मंदाकिनी खडसेंना ईडीचे समन्स;आज होणार चौकशी


जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांना सावदा, यावल, कुंभारखेडा, आचेगाव परिसरात अवैध सावकारी करीत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. बिडवाई यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील आठ पथकांच्या नियुक्त्या केल्या. सोबत वरणगाव, यावल, सावदा येथील पोलिस बंदोबस्त दिला. त्यांना अवैध सावकारी करणारे संशयित नंदकुमार मुकुंदा पाटील, सुधाकर मुकुंदा पाटील, सुदाम तुकाराम राणे, मुधकर तुकाराम राणे (सर्व रा. बुधवारपेठ, सावदा), मुरलीधर तोताराम भोळे (रा. यावल), मुरलीधर काशीनाथ राणे (रा. कुंभारखेडा), श्रीधर गोपाळ पाटील (रा. आचेगाव, ता. भुसावळ), रमेश भादू इंगळे व सुनंदा रमेश इंगळे (रा. तासखेडा, ता. रावेर) यांच्या घरावर छापे टाकून सावकारी संदर्भात कागदपत्रांची तपासणी केली. मंगळवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. दोन घरे बंद असल्याने कारवाई करता आली नाही, तर आठ ठिकाणी काय काय संशयित कागदपत्रे आढळतात, त्यावरून पुढील कारवाई होणार आहे.

Illegal lenders
बाजीराव पेशवेंची उद्या जयंती; शिवराजसिंह,सिंधियांची यांची उपस्थिती


विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर यांनी मार्गदर्शन केले. तपासणी करणाऱ्या पथकामध्ये पथकप्रमुख म्हणून, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संजय गायकवाड (चोपडा), किशोर पाटील (अमळनेर), विजयसिंग गवळी (जळगाव), मंगेशकुमार शहा (जळगाव), रवींद्र तायडे (जामनेर), नामदेव सूर्यवंशी (पाचोरा), गुलाब पाटील (एरंडोल), जगदीश बारी (जामनेर), प्रदीप बागूल (चाळीसगाव) व त्यांच्या सहकाऱ्यांचा सामावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.