जळगाव जिल्हा गोळीबाराने पुन्हा हादरला;नशिराबादजवळ घटना,एक ठार

Jalgaon Crime News: आधीपासून दबा धरुन असलेल्या चार-पाच जणांनी मनोहर सुरळकर व त्याचा मुलगा धर्मा सुरळकर यांच्यावर मिरची पूड फेकून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
crime
crime
Updated on



जळगाव/नशिराबाद : एरवी शांत असणाऱ्या नशिराबाद गावात आज संध्याकाळी गोळीबाराची (Firing) घटना घडली. पूर्ववैमनस्यातून काही अज्ञात व्यक्तींनी भुसावळातील पिता-पुत्रावर हल्ला चढवत गोळीबार करुन चॉपरने हल्लाही (Attack) केला. यात पुत्र जागीच ठार (Death) झाला, तर पिता गंभीर जखमी झाला आहे.

crime
मुलाच्या मृत्यूचा धक्का;आईनेही सोडले प्राण


घटनेचे वृत्त कळताच नशिराबाद ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे ताफ्यासह चौपदरी महामार्गाच्या अंडरपासजवळी घटनास्थळी आले. वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळीही तेथे पोचले व तपासासंदर्भात सूचना केल्या.

अशी घडली घटना
घटनेची पार्श्वभूमी अशी की, भुसावळ येथील पंचशील नगरातील रहिवासी सुरळकर आजच जामिनावर सुटून घरी चालले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नशिराबाद चौबे पेट्रोल पंपाच्या पुढील अंडरपासजवळ आधीपासून दबा धरुन असलेल्या चार-पाच जणांनी मनोहर सुरळकर व त्याचा मुलगा धर्मा सुरळकर यांच्यावर मिरची पूड फेकून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एवढ्यावरच हे मारेकरी थांबले नाहीत तर त्यांनी धारदार शस्त्राने वारही केले. अवघ्या काही मिनिटात हा थरार झाल्यानंतर हल्लेखोर तेथून फरार झालेत. या हल्ल्यात धर्मा सुरळकर जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले.

crime
गुजरातच्या मोस्ट वॉंटेडला नवापूरमधून अटक; सुरत एटीएसची कारवाई


पोलिस दाखल
घटनेची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आपल्या ताफ्यासह हजर झाले भुसावळ येथील डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि जळगावचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()