crop
cropcrop

जळगाव जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या ९४ टक्क्यांवर

Jalgaon Farming News: जळगाव जिल्ह्यात कापसाची लागवड सुमारे पाच लाख २५ हजार हेक्टरवर झाली आहे. पण कोरडवाहू कापसाची स्थिती अनेक भागात बिकट आहे.
Published on
Summary

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा व जळगाव तालुक्यांतील काही भागात पेरणी करूनही ती वाया गेली आहे.


जळगाव : खानदेशात १२ जुलैपर्यंत अनेक भागांत अल्प पाऊस होता. यानंतरही सर्वत्र जोरदार पाऊस बरसला नाही. परिणामी अनेक तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. यातच धरणांमधील साठाही कमीच आहे. तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) येथील धरणातूनही विसर्ग कमी करण्यात आला आहे. अशा स्थितीतही जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी चांगली असल्याचे दावे कृषी विभाग करीत आहे.

crop
जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु !


खानदेशात कृषी विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. एका कृषी सहाय्यकाकडे चार ते पाच गावांचे काम आहे. सर्वच गावांमध्ये यंत्रणा पोचत नाही. त्यात इतर कामांचा व्याप आहे. यामुळे पेरणीचे नेमके आकडे गोळा करून ते कृषी विभागाकडे सादर झालेले नाहीत. यात पेरणीच झालेली नाही. याबाबतही कृषी विभाग स्पष्टपणे सांगत नाही. पंचनामे करीत नाही. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा व जळगाव तालुक्यांतील काही भागात पेरणी करूनही ती वाया गेली आहे. अशा स्थितीत पेरणीचे उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के साध्य झाल्याचा चुकीचा दावा कृषी विभाग करीत आहे, असा दावाही शेतकरी करीत आहेत.

पेरणीत पावसामुळे घट
सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पेरणीत मोठी घट या जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे आली आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागांत पिकाची स्थिती बरी आहे. विहिरी तळ गाठत आहेत. यामुळे खानदेश दुष्काळाच्या छायेत आहे. याबाबत तातडीने व्यवस्थित सर्वेक्षण करून मदतनिधी जाहीर करावा, असा मुद्दा पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

crop
खानदेशची केळी आता राज भवनात


सव्वापाच लाख हेक्टरवर कपाशी
जळगाव जिल्ह्यात कापसाची लागवड सुमारे पाच लाख २५ हजार हेक्टरवर झाली आहे. पण कोरडवाहू कापसाची स्थिती अनेक भागात बिकट आहे. कापसाची लागवड अपेक्षित क्षेत्रात झालेली नाही. फक्त पूर्वहंगामी कापूस पीक चांगले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

crop
महाड पुरग्रस्तांना खानदेशी तरुणांईने दिला मदतीचा हात


मी पावसाचा खंड असल्याने सोयाबीनची पेरणी करू शकलो नाही. सोयाबीनचे पाच एकरसाठी खरेदी केलेले बियाणे कृषी केंद्राला पेरणीअभावी परत केले. इतर पिकांची पेरणीदेखील आमच्या भागात रखडली.
- विजय झोपे, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()