जिल्ह्यात पाऊस लांबला तरी टंचाई नाही; प्रकल्पांत ३३ टक्के साठा

जिल्ह्यात पाऊस लांबला तरी टंचाई नाही; प्रकल्पांत ३३ टक्के साठा
Waghur dam project
Waghur dam projectsakal
Updated on

जळगाव : जिल्‍ह्यात सध्या तीव्र पाणी टंचाई (Water scarcity) नाही. पावसाळा लांबला तरी तूर्तच पाणी टंचाईचा प्रश्‍न जळगावसह जिल्ह्याला जाणविणार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह (Jalgaon district water project) तेरा मध्यम व ९६ लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका आहे. या प्रकल्पांमध्ये आज १६.५० टीएमसी म्हणजेच ३२.७३ टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा ४६.७८ टक्के इतका म्हणजेच ४.०५ टक्के इतका अधिक होता. (jalgaon-district-no-Water-scarcity-prolonged-rains)

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात १४.०९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यात (Hatnur dam) हतनूर १७.०६ टक्के, गिरणा ४७.०२ %, तर वाघूर धरणात ६५.०८ % उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये १.५७ टीएमसी, ९६ लघु प्रकल्पात ०.८४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

Waghur dam project
प्री-वेडिंग शूटमध्ये जुनं ते सोनं ट्रेंडची एंट्री!

१६.५० टीएमसी साठा

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून आजच्या दिवशी या सर्व प्रकल्पांमध्ये १६.५० टीएमसी म्हणजेच ३२.७३ टक्के इतका आहे. तर मागील वर्षी हा साठा १८.५४ टीएमसी इतका होता.

जळगाव शहराला पाणी प्रश्‍न नाहीच

जिल्ह्यातील हतनूर धरणात १.५४ टीएमसी (१७.०६) गिरणा धरणात ६.८४ टीएमसी (३७.०२) तर वाघूर धरणात ५.७१ टीएमसी (६५.०८) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात ६२.०६ टक्‍के, मंगरुळ ३८.६८, सुकी ४८.५७ मोर ५४.९२, तोंडापूर ४४.९८, बहुळा २९.८७ %, अंजनी २१.९१, भोकर १६.५५ टक्‍के उपयुक्त साठा शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.