पोलिसांनीच घडवली न घडलेली दंगल..!

Jalgaon Police News : अचानक तीन वाजताच नियंत्रणकक्षाने कासमवाडीत जातीय दंगल उसळल्याचा संदेश रवाना केला आणि संर्वाची एकच धांदल उडाली.
mockdrill
mockdrill
Updated on
Summary

मिळेल त्या मार्गाने पोलिच कासमवाडीतच शिरत असल्याने रहिवासी ही चक्रावले. कासमवाडी रेाडवरील शेवटचे टोक घरकुलाजवळ सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता पथकासह हजर होते.

जळगाव : पोलिस नियंत्रणकक्षाने (Police control room) कासमवाडीत दंगल घडल्याचा वायरलेस संदेश पाठवला..अन्‌ अधिकारी कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सहाच्या सहा पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांसह डीबी पथके आणि हजर कर्मचाऱ्यांचा दंगलीच्या घटनेला पोलिस म्हणुन दिलेला प्रतिसाद आणि गांभीर्य यांची दखल घेण्यासाठी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथानी (Assistant Superintendent of Police Kumar Chinthani) दंगलीचा मॉकड्रील (Riot mockdrill) घडवुन आणले. संदेश मिळाल्यानंतर दहा मिनीटात सर्व सज्ज अवस्थेत दाखल झाले. उर्वरीत एका मागून एक आले. वेळेत पोहचणाऱ्यांचे सहाय्यक अधीक्षकांनी कौतुक केल्यावर कर्माचारी अधीकाऱ्यांनी न घडलेल्या दंगलीचा सुसकारा सोडला.

mockdrill
जळगाव महिला रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदीत घोळ?


संवेदनशील जळगाव शहरात केव्हा काय, घडेल याचा नेम नाही. त्यावर जर नियंत्रणकक्षातूनच सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस संदेश पोहचत असेल तर, मग धावपळ उडणारच. असेच काहीसे मंगळवारी ऐन दुपारी तीन वाजता घडले. जेवणाच्या वेळेनंतर सर्व पेालिस ठाण्यांचे अंमलदार, निरीक्षक, डीबी पथके निवांत असतांना अचानक तीन वाजताच नियंत्रणकक्षाने कासमवाडीत जातीय दंगल उसळल्याचा संदेश रवाना केला आणि संर्वाची एकच धांदल उडाली. जातीय दंगल म्हटली की, पोलिसांना सरंजामसह घटनास्थळ गाठणे क्रमप्राप्त असते, लाठ्या हेल्मेट, अश्रुधुरचे नळकांडे, घेवून धावत सुटावे लागते. दस्तुरखुद्द सहाय्यक पोलिस अधीक्षकांनीच वायरलेस संदेश दिल्याने आणखीनच गांर्भीय वाढले. होते त्या अवस्थेत पेालिस कर्मचारी, अधीकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. एमआयडीसीची हद्द असतांना, शनिपेठ, जिल्‍हापेठ, रामानंद तालूका आणि शहर असे सर्व पेालिस ठाण्यांचा ताफा घटनास्थळाकडे पळत सुटला. मिळेल त्या मार्गाने पोलिच कासमवाडीतच शिरत असल्याने रहिवासी ही चक्रावले. कासमवाडी रेाडवरील शेवटचे टोक घरकुलाजवळ सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता त्यांच्या पथकासह हजर होते. चारही दिशांनी कर्मचारी अधीकाऱ्यांची वाहने धडकत होती. आणि प्रत्येक वाहनातील अधीकाऱ्यांची तयारी, कर्मचाऱ्यांच्या तत्परता वेळेनुसार आणि लाठी-काठी हेल्मेटसह नोंदवण्यात आली.

police
police


एमआयडीसी डीबी एकनंबर
संदेश मिळताच घटनास्थळावर एका बाजुने शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, काही कर्मचाऱ्यांना घेवुन कासवाडीत शिरले, दुसरी कडून एमआयडीसी डीबी पथकही धडकले. संदेश मिळाल्यानंतर दोघेही दहा मिनीटांच्या आत घटनास्थळावर पोचल्याने सहाय्यक अधीक्षकांनी कौतुक केले.

mockdrill
पीकविम्याबाबत लवकरच कार्यवाही; केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन


अन्‌ सुटकेचा निश्वास..
धावतपळत अधीकारी कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. दंगलीचा संदेश असल्याने आणि साहेब स्वतः हातळणी करत असल्याने जो-तो पळत सुटला हेाता. घटनास्थळावर पोहचल्यावर मात्र, न घडलेल्या दंगलीचे प्रात्याक्षीक( मॉकड्रील) असल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि सहाय्यक अधीक्षकांनी स्मीत हस्य करत समाधानही व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.