जळगाव जिल्ह्यात २४ तासांत ५० मिलिमीटर पाऊस

Jalgaon Rain News:कृषी आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलिमीटर आहे.
Rain
Rain
Updated on

जळगाव ः गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मंगळवार पासून पुन्हा पाऊस (Rain) सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा पाऊस नसल्याने खरिपाचे (Kharip) उत्पादन येते किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांना (Farmers) चिंता होती. उडीद, मूग ही पिके (Crop) पावसाअभावी पिवळी पडली होती. यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानीच्या पंचनाम्याचे मागणी होत होती. त्यात मंगळवारपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

Rain
जळगावातील मेडिकल हबचे काम मार्गी लागणार -वैद्यकीय शिक्षणमंत्री


दरम्यान, २४ तासांत सर्वाधिक ८०.७ मिलिमीटर पाऊस पारोळा तालुक्यात झाला. सर्वांत कमी पाऊस २८.८ मिलिमीटर मुक्ताईनगर तालुक्यात झाला. कृषी आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलिमीटर आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १९६.१ मिलिमीटर असून, आजपर्यंत जिल्ह्यात ६७.९ मिलिमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ३४.६ टक्के पाऊस झाला आहे.

RAIN
RAIN

सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मिलिमीटर
जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मिलिमीटर, जुलैत १८९.२ मिलिमीटर, ऑगस्टमध्ये १९६.१ मिलिमीटर, तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२३.६ मिलिमीटर आहे. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमान ६३२.६ मिलिमीटर असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय जूनपासून आज (१८ ऑगस्ट)पर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये कंसात (जून ते आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- ३१५.३ मिलिमीटर (६६.१ टक्के), भुसावळ- २९२.२ (६९.६), यावल- २९२ (६५.५), रावेर- ३२४.६ (७६), मुक्ताईनगर- २४७.२ (६५), अमळनेर- २६२.२ (६५.३), चोपडा- २३३.४ (५०.७), एरंडोल- ४०६ (९६.१), पारोळा- ४७३.९ (११३.७३), चाळीसगाव- ४२७.७ (१०९.१), जामनेर- ३६६.९ (७८.७), पाचोरा- ३६४.३ (८६.८), भडगाव- ३५५.७ (८४.८) धरणगाव- ३८८.८ (७३.४), बोदवड- ३१८.६ (७३) याप्रमाणे जिल्ह्यात ऑगस्टपर्यंतच्या सरासरीच्या एकूण ३३३.४ मिलिमीटर म्हणजे ७८.१ टक्के पाऊस झाला आहे.

RAIN
RAIN

पिकांना जीवदान
पावसाअभावी उडीद, मुगाची पिके वाया गेली आहेत. आता पडलेला पाऊस ज्वारी, बाजरी, मका, तूर, कपाशी, सोयाबीनला चांगला आहे. या पावसाने या पिकांना जीवदान मिळून पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे कृषी विभागाने सांगितले. अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात नद्या, नाल्यांना पूर आलेला नाही. यामुळे आणखी पाऊस पडला तरच धरणे, मध्यम, लघु प्रकल्प भरतील. तरच सिंचनासाठी पाणी वापरता येणार आहे.

Rain
ज्वारी खरेदीसाठी उन्मेश पाटलांचे भुजबळांना पत्र

२४ पर्यंत पावसाचा अंदाज
जिल्ह्यात १७ ते २४ हे आठ दिवस चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी अधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.