रेमडेसिव्हिर उपचारातून बाद मात्र वापर सुरूच!

रेमडेसिव्हिरच्या काळ्या बाजारातून कोट्यवधींची लूट झाल्यानंतर हे इंजेक्शन उपचारातून बाद करण्यात आले.
Remdesivir
RemdesivirRemdesivir
Updated on


जळगाव : कोरोनावर (corona) कोणत्याही प्रकारचे औषध नसताना न्यूमोनियावर (Pneumonia) उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हिरचा (Remdesivir) संसर्गाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणावर वापर आणि पर्यायाने काळा बाजारही झाला. कोट्यवधींच्या उलाढालीनंतर हे इंजेक्शन कोरोनावरील उपचारातून वगळण्यात आले असले तरीही काही ठिकाणी त्याचा वापर सुरूच आहे. मात्र, रुग्णसंख्या घटल्यानंतर रेमडेसिव्हिरची मागणीही अल्प असून, त्याचा साठा मेडिकलमध्ये पडून असल्याचे सांगितले जात आहे. ( jalgaon district remedivir after corona treatment continued to be used)

Remdesivir
जळगावमध्ये 'क्लाउड कव्हर' नसल्याने पाऊस बेपत्ता


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक चर्चा झाली ती रेमडेसिव्हिर या ‘लाइफ सेव्हिंग’ इंजेक्शनची. खरेतर या दोन्ही लाटांमध्ये जळगाव जिल्हा सुरवातीपासूनच ‘हॉटस्पॉट’ बनला. जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पहिल्या लाटेपेक्षा अधिक होती. संसर्गाचा वेग, रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले होते. उपचारपद्धती माहीत होऊनही या लाटेने विशेषत: ३५ ते ५५ या वयोगटातील तरुणांचे अधिक बळी घेतले.


रेमडेसिव्हिरचा काळा बाजार

जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील तीव्रता वाढल्यानंतर रेमडेसिव्हिरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली. पुरवठा कमी व मागणी अधिक त्यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणात झाला. दोन-चार हजार ‘एमआरपी’ असताना २०-२५ हजारांना ते विकले गेले. या स्थितीत रेमडेसिव्हिर, ‘टॉसी’ यांसारख्या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांना स्वत:कडे घ्यावे लागले व शासकीय तसेच खासगी हॉस्पिटलसाठी त्याच्या वितरणाचे नियोजनही करून द्यावे लागले.

...नंतर उपचारातून बाद
रेमडेसिव्हिरच्या काळ्या बाजारातून कोट्यवधींची लूट झाल्यानंतर हे इंजेक्शन उपचारातून बाद करण्यात आले. ‘आयसीएमआर’ने त्याबाबत दिशानिर्देश जारी केले. त्यामुळे सध्या रुग्ण कमी होत असले तरी रेमडेसिव्हिरच्या वापराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Remdesivir
झोटिंग समितीच्या अहवालाचे गौडबंगाल..!


अद्यापही वापर सुरूच
आयसीएमआरने रेमडेसिव्हिरच्या वापराबाबत दिशानिर्देश जारी करून ते उपचारातून बाद ठरवले असले तरी ‘लाइफ सेव्हिंग ड्रग’ म्हणून डॉक्टर त्याचा वापर करत आहेत. तज्ज्ञांच्या मते अजूनही या इंजेक्शनचा वापर सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतही योग्य वेळी या इंजेक्शनचा वापर केल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आल्याचा तज्ज्ञांचा अनुभव आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर अद्यापही सुरूच आहे. अर्थात, ते उपचारातून बाद केले असले तरी त्यावर बंदी मात्र नाही, असेही सांगण्यात आले.


मागणी अगदीच नगण्य
रेमडेसिव्हिर उपचारातून बाद ठरल्यानंतरही त्याचा वापर सुरू असला तरी सध्या त्याची मागणी घटली असून, आता अगदीच बोटावर मोजण्याइतक्या इंजेक्शनची विक्री सुरू आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता शंभराच्या टप्प्यात असून, गंभीर रुग्ण तीसच्या आतच आहेत. त्यामुळेही या इंजेक्शनला सध्या मागणी नाही.

Remdesivir
जळगावमध्ये महिन्याभरात तीन वेळा लसीकरण केंद्रे बंद


तज्ज्ञांचे मत...
रेमडेसिव्हिर उपचारातून बाद ठरवले असले तरी ते ‘लाइफ सेव्हिंग ड्रग’ म्हणून सिद्ध झाले आहे. कोरोनाबाधित जोखमीच्या रुग्णांना ते योग्य वेळी दिल्यास उपयुक्त ठरते. ज्यांचा सीटी स्कॅन स्कोअर पाचपेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांच्या बाबतीत त्यांचे वय व अन्य आजारांची पार्श्वभूमी पाहून हे इंजेक्शन वापरता येऊ शकते. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये या इंजेक्शनमुळे अनेकांचे जीव वाचले, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे त्याचा वापर सुरूच आहे.
-डॉ. राहुल महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.