जळगाव जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घोषित

स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Hangandari mukta
Hangandari mukta
Updated on

जळगाव : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायती (Gram Panchayat) या हागणदारीमुक्त (Hagandari Mukta) प्लस म्हणून घोषित करण्यात आल्या. केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) (Swachh Bharat Mission) टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 1 मध्ये वैयक्तीक शौचालय यावर भर देण्यात आलेला होता. मात्र स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 मध्ये हागणदारी मुक्त अधिक (ODF PLUS) ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

Hangandari mukta
जिल्हा बँक निवडणूकीच्या घडामोडी;खडसे-महाजन एकत्र येणार का?



हागणदारी मुक्त अधिक म्हणजे ग्रामीण भागातील गावांसाठी हागणदारीमुक्तचे मानांकन प्राप्त गावांमध्ये, शौचालयाचे बांधकाम/ पुनर्प्रस्थापितकरण, सामुदायिक शौचालय संकुल, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करून स्वच्छता शाश्वतरित्या कायम ठेवणे." यात वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे पूर्ण करून जिल्ह्यात हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) मानांकानाचा दर्जा प्राप्त करणे करिता विविध निकषांची पूर्तता करून नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक पदे (ODF PLUS) घोषित करायचे आहेत.

Hangandari mukta
चिखलात ‘रुतले’ जीवनाचे चाक..आणि खड्यांनी घेतला गृहस्थाचा बळी

पहिल्या टप्प्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायती
अमळनेर- मंगरूळ, भुसावळ- सुसरि, भडगाव- बोरणार, बोदवड -हरणखेड, चाळीसगाव- चैतन्य तांडा, चोपडा- घुमावल बुद्रुक, धरणगाव -मुसळी, एरंडोल- पिंपरी बुद्रुक, जळगाव- जळगाव खुर्द, जामनेर- करमाड, मुकताईनगर- चिंचोल,कोथळी, पाचोरा- सारोळा बुद्रुक, वाणेगाव, पारोळा- सबगव्हाण, रावेर - चिनावल, यावल- बोराळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.