एकाच दिवशी १२ हजार तरुणांनी घेतली कोरोनाची लस

शंभरपेक्षा अधिक केंद्रांवर आज कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन लशींचे डोस प्राप्त आहे
vaccination
vaccinationvaccination
Updated on



जळगाव : जिल्ह्यात मंगळवार (ता. २२)पासून १८ वर्षांवरील नागरिकांची (vaccination) लसीकरण मोहीम सुरू झाली. शहरासह जिल्ह्यातील तरुणाईने (Youth)या अभियानास चांगला प्रतिसाद (Vaccine Campaign) दिला. एकट्या जळगाव शहरात दिवसभरात अडीच हजारांवर नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccine) देण्यात आली.(jalgaon district youth good response corona vaccination)

vaccination
सुसाट 'एसटी'ने दुचाकींना उडवीले; दोन जणांचा मृत्यू

सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचे अभियान २१ जूनपासून सुरू केले. जळगाव जिल्ह्यात मात्र रविवारी पुरेसा साठा नसल्याने २२ जूनपासून ही मोहीम सुरू झाली. जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक केंद्रांवर आज कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन लशींचे डोस प्राप्त झाल्यानंतर सकाळी ९.३० पासून लसीकरण सुरू झाले.

शहरात चांगला प्रतिसाद
जळगाव शहरात महापालिकेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या नऊ केंद्रांवर आज सकाळपासून लसीकरण सुरू झाले. या सर्व केंद्रांवर मिळून दोन हजार २२८ जणांना लशीचा पहिला व काहींना दुसरा डोस देण्यात आला. रोटरी सभागृह, मायादेवीनगरातील केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. तर रेडक्रॉसच्या केंद्रावर दिवसभरात सुमारे ५०० नागरिकांना लस देण्यात आली. त्यापैकी १८ ते ४४ वयोगटांतील ४०० जणांचा समावेश आहे.

vaccination
जळगाव जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’चे एकाच कुटुंबात सात रुग्ण

जिल्ह्यात १५ हजारांवर लोकांना लस
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये व अन्य अशा १३९ केंद्रांवर दिवसभरात १५ हजार ५८० जणांना लशीचा पहिला डोस, तर ८९८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. यात १८ ते ३० वयोगटांतील तब्बल ११ हजार २८८ तरुणांचा समावेश आहे. तर खासगी हॉस्पिटलच्या तीन केंद्रांवर २११ जणांनी लस घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.