खडसेंनी फडणवीसांना करुन दिली भीष्मप्रतिज्ञेची आठवण!

फडणवीसांना ओबीसीचे केवळ राजकारण करायचे होते..
Fadnavis-Khadse
Fadnavis-KhadseFadnavis-Khadse
Updated on


जळगाव ः स्वतंत्र विदर्भ न झाल्यास आपण विवाह करणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. परंतु, त्यांनी लग्नही केले, आणि त्यांना मुलगीही झाली. अशा अनेक प्रतिज्ञा (Promise) त्यांनी मोडल्या असून त्यात ते माहीर आहेत, असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसेंनी फडणवीसांना (Eknath Khadse) लगावला. ओबीसी आरक्षणावरुन (OBC reservation) फडणवीसांनी केलेल्या ‘माझ्या हातात सत्ता द्या, ओबीसींना आरक्षण देतो.. तसे न झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन..’ या घोषणेचा खडसेंनी समाचार घेतला. (eknath Khadse remember devendra fadnavis independent virdabha promise)

Fadnavis-Khadse
या फुलांचे हे सौंदर्य बघीतले तर..तुमचे मन होणार प्रसन्न!

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, २०११ जनगणना झाली त्यात ओबीसींची आकडेवारी ही केंद्राकडे होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना या आकडेवारीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा पत्र दिले. तसेच गोपीनाथ मुंडे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रितम मुंडे, खासदार रक्षा खडसे यांनीही त्यासाठी पाठपुरवा केला होता. परंतु, फडणवीसांची सत्ता असून ते केंद्राकडून माहिती मिळवू शकत होते. परंतु, फडणवीसांना ओबीसीचे केवळ राजकारण करायचे होते, ओबीसी नेत्यांचा वापर करून नंतर त्यांना बदनाम केले. त्यामुळे ते विश्वास ठेवण्यासारखे नाही.

Fadnavis-Khadse
५४१ ग्रामपंचायतींचा ‘डीएससी’कडे नोंदणीस नकार

सत्ता द्या, आरक्षण देतो म्हणजे काय?
देवेंद्र फडणवीस म्हणतात मला सत्ता द्या.. मी ओबीसी आरक्षण मिळवून देतो. म्हणजे काय? म्हणजे या आधी ते आरक्षण मिळवून देवू शकत होते. आणि आता सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप असून ते पुन्हा ओबीसी आरक्षणाचे राजकारण करत आहे. खरच आरक्षण मिळवून द्यायचे असेल तर केंद्राकडून ओबीसी जनगणनेची माहिती मिळवून द्यावी आणि राज्यशासनाची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.