जळगाव : पंधरा दिवसांपासून पावसाने (Rain)दडी मारल्यामुळे दुबार पेरणीच्या (Sowing) सावटात असलेली पिके आता करपू (Burn) लागली आहेत. दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर जिल्ह्यातील सर्व पेरणी वाया जाण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) डोळे आभाळाकडे लागले आहेत. (farmers worried as rains started burning crops)
जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन वेळेत झाले. सुरवातही चांगली होईल, अशी चिन्हे जूनच्या मध्यांतरात दिसत होती. त्या वेळी जिल्ह्यातील विविध भागांत चांगला पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम, तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाच्या आधारे जिल्ह्यात पेरण्यांनाही जोमाने सुरवात झाली. शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातील पावसाच्या आधारे पेरणी केली नाही. दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीला वेग आला.
६० टक्क्यांवर पेरण्या
पावसाची समाधानकारक सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. तरीही जिल्ह्यात केवळ ६० ते ६२ टक्केच पेरण्या झाल्या. मात्र, पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या पेरण्यांवर संकट कोसळले आहे. सर्व पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
तापमानाने नुकसान अधिक
एरवी पाऊस लांबला, तरी वातावरणात गारवा असतो. रोज ढग भरून येतात. या वेळी मात्र तसे झाले नाही. पावसाने ओढ दिल्यानंतर उन्हाची तीव्रता कमालीची वाढली. तापमानाचा पारा ऐन जुलैत ४० अंशांवर पोचला. त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाने पिकांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिके करपू लागली
दोन आठवड्यांपासून पाऊस नाही. ज्या शेती बागायती आहेत, तेथील पिके तग धरून आहेत. काहीअंशी वर आलेल्या पिकांना वरून पाणी देत वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी आता पिके करपू लागली आहेत, तर काही भागांत पीक जमिनीबाहेरच आलेले नाही.
अंदाजावर अपेक्षा
राज्याच्या हवामान खात्याने दहा जुलैनंतर पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. मॉन्सून सक्रिय होण्यास पूरक वातावरण तयार होत असून, दोन दिवसांत चांगला पाऊस होईल, असाही अंदाज आहे. त्यामुळे या अंदाजावर बळीराजा तग धरून आहे. दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर सर्व पेरण्या वाया जातील.
काही पेरण्या पूर्ण वाया
ज्या शेतकऱ्यांनी पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर पेरण्या उरकल्या आहेत, त्यांच्या पहिल्या पेरण्या पूर्ण वाया गेल्याचे वृत्त आहे. दुबार पेरणीही काही भागांत झाली असून, ती पावसाअभावी धोक्यात आली आहे.
पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, शेतकरी चिंतेत आहेत. आता दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर गंभीर स्थिती निर्माण होईल. सर्व पेरण्या वाया जातील व पुन्हा पेरणी करणे कठीण होईल.
-चिंतामण पाटील, शेतकरी, भोणे (ता. धरणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.