जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

Jalgaon Cime News : गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार हल्लेखोर हे चारचाकी वाहनातून आले.
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर  गोळीबार
Updated on

जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील (Deputy Mayor Kulbhushan Patil) यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार (Firing) झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. जळगावची कायदा आणि सुव्यवस्था केव्हाच बासनात गुंडाळण्याची परिस्थिती असून आज चक्क जळगाव नगरीचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
( firing on deputy mayor of jalgaon municipal corporation kulbhushan patil)

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर  गोळीबार
Monsoon Tips: 'घर गळतंय'? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स


पूर्ववैमनस्यातून हल्ला
गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार हल्लेखोर हे चारचाकी वाहनातून आले. त्यांनी पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले. तक्रार देण्यासाठी ते रात्री उशिरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले.


वाळू व्यावसायिक ते उपमहापौर
कुलभूषण पाटील यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आपल्या कारकीर्दीस सुरवात केली. मागे वाळू व्यावसायिकांच्या वादातही त्यांचे नाव आले. वाळू माफिया म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र,गेल्या मार्च महिन्यात जळगाव महानगरपालिकेच्या सत्तांतरात कुलभूषण पाटील यांना रातोरात ग्लॅमर प्राप्त होऊन ते जळगाव नगरीच्या उपमहापौरपदी विराजमान झाले. हे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत. कुलभूषण पाटील यांच्यावर झालेला हल्ला नेमका वाळू व्यवसायातून आहे की, राजकीय वादातून हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र उपमहापौर आवर आज थेट गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी कुलभूषण पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. सध्या त्यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली आहे. उपमहापौरांची अनेकांनी दूरध्वनीवरून चौकशी केली.

पोलीसात तक्रार..
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील परिसरातील काही नागरिक प्रत्यक्षदर्शी यांच्यासह तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोहोचले होते, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, निरीक्षक अनिल बडगुजर पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले होते.

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर  गोळीबार
अजित पवारांच्या दौऱ्यात बदल; सांगलीकडे रवाना

क्रिकेटच्या वादात मध्यस्थी
उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी क्रिकेट करण्यावरून झालेल्या वादात हाणामारी होत असताना आपण त्यात मध्यस्थी केली. पोलीस स्टेशनला दोन्ही कडच्या मंडळींना समजूत घालत असताना एका पक्षाने शिवीगाळ केली, तर संध्याकाळी मोबाईलवर फोन करूनही शिवीगाळ करण्यात आली. हल्लेखोरांनी मध्ये
मंगल सिंग राजपूत, महेंद्र राजपूत, बिऱ्हाडे, जुबेर,उमेश राजपूत अशांचा समावेश असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सकाळी शी बोलताना सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()