तर..दहा वर्षांनी जळगावचे तापमान चार अंशांपर्यंत खाली

सामाजिक वन विभाग, वन विभागाला दर वर्षी वृक्षारोपणाचा लक्ष्यांक दिला जातो.
तर..दहा वर्षांनी जळगावचे तापमान चार अंशांपर्यंत खाली
Updated on


जळगाव ः जिल्ह्याचे तापमान उन्हाळ्यात (Temperature summer) काही वर्षांपासून ४७ अंशांपर्यंत जाते. याला पर्याय म्हणून प्रत्येकाने झाडे लावणे हाच पर्याय आहे. जिल्ह्यातही दर वर्षी ३४ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने (State Government)२०१९ मध्ये ठरविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) ओसाड जागांवर तीन हजार झाडे दर वर्षी लावणे अपेक्षित होते. ही प्रक्रिया दहा वर्षे चालली, तर जळगावचे ४७-४८ अशांवर जाणारे तापमान चार अंशांपर्यंत खाली आणण्याचे वन विभागाने (Forest Department) नियोजन होते, असा दावा सामाजिक वन विभागाने केला. (forest department planning jalgaon temperature low)

तर..दहा वर्षांनी जळगावचे तापमान चार अंशांपर्यंत खाली
मनपा कर्जमुक्तीची घोषणा केवळ फसवी

२०१९ मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एक हजार १५३ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने वन विभाग, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग आदींच्या सहकार्याने ओसाड जमिनी, मोकळ्या जागा, नदीकाठी, रहिवास परिसरातील मोकळ्या जागांवर दर वर्षी तीन हजार झाडे लावण्याचे नियेाजन होते. सोबतच इतर शासकीय विभागांनाही वृक्षलागवडीचे नियोजन दिले होते. २०१९ मध्येच हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. त्या वेळी सर्वच शासकीय विभागांच्या मदतीने सर्वाधिक वृक्षलागवड झाली. नंतर ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम बंद झाली. सामाजिक वन विभाग, वन विभागाला दर वर्षी वृक्षारोपणाचा लक्ष्यांक दिला जातो. इतर शासकीय विभागांना वृक्षारोपणाचा लक्ष्यांक नाही. सामाजिक संस्था, वन विभाग दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करतात.

असे होते चार अंश तापमान येण्याचे गणित
*जिल्ह्यात ग्रामपंचायती : १,१५३
*दर वर्षी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : ३ हजार झाडे
*दर वर्षी होणारी संभाव्य लागवड : ३४ लाख झाडे
*आगामी दहा वर्षांत होणारी लागवड : ३ कोटी ५० लाख झाडे
यामुळे जिल्ह्याचे तापमान चार अंशांपर्यंत नक्कीच खाली आले असते.

तर..दहा वर्षांनी जळगावचे तापमान चार अंशांपर्यंत खाली
‘पोकरा’ अर्थसहाय्याची २२ हजारांवर शेतकऱ्यांना संजीवनी

जिल्ह्यात ३३ कोटी वृक्षलागवड योजना सुरू राहिली असती. सर्व शासकीय विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले असते, तर आगामी दहा वर्षांत शहराचे तापमान चार अंशांपर्यंत खाली आले असते. आता ती योजना नसली, तर सामाजिक वनीकरण व वन विभागातर्फे यंदा १६ लाख वृक्षलागवडीचे नियोजन आहे.
-डॉ. एस. आय. शेख, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()