वनक्षेत्रपालांअभावी वनीकरणाच्या विभागाचा गाढा चालणार कसा?

चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड ही तालुके एकमेकांच्या जवळ आहे. या तालुक्यांतील चारही वनक्षेत्रपालांची बदली एकाच वेळी झाली.
Tree planting
Tree planting
Updated on
Summary

सामाजिक वनीकरणातर्फे अकरा लाख वृक्षलागवडीचे यंदा नियोजन करण्यात आले होते. शंभर कोटी वृक्षलागवड मोहीमही सुरू होती.


जळगाव ः जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागातील ( Social Forestry Department) सात वनक्षेत्रपालांच्या (Forester) बदल्या झाल्याने जिल्ह्यात केवळ सहा वनक्षेत्रपालांवर कार्यभार सुरू आहे. वनक्षेत्रपालांअभावी पन्नास कोटी वृक्षलागवड (Tree planting) मोहिमेसह नियमित वृक्षारोपण मोहिमेचा फज्जा उडणार आहे. कारण पंधरा तालुक्यांत केवळ सहा वनक्षेत्रपाल कारभार कसा सांभाळणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Tree planting
PHOTO:बहिणाबाई चौधरींच्या स्मारकाची अवहेलना थांबवा-खासदार पाटील

जिल्ह्यात चौदा तालुक्यांत सामाजिक वनीकरणातर्फे अकरा लाख वृक्षलागवडीचे यंदा नियोजन करण्यात आले होते. शंभर कोटी वृक्षलागवड मोहीमही सुरू होती. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वनक्षेत्रपालांची १४ पदे मंजूर आहेत. त्यातील एक पद रिक्त आहे. म्हणजेच १३ पदांवर कार्यभार होता. त्यापैकी याच महिन्यात त्यातील दोघांची पदोन्नतीने बदली झाली. चार जणांच्या बदल्या झाल्या. एकाची विनंतीवरून बदली झाली. एक पद रिक्त आहे. १३ पदांपैकी सात जणांची बदली आहे. सहा शिल्लक आहेत. सहा वनक्षेत्रपालांवर कारभार कसा करावा, असा प्रश्‍न आहे.

बदल्या झालेले जवळच्या तालुक्यातील
चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड ही तालुके एकमेकांच्या जवळ आहे. या तालुक्यांतील चारही वनक्षेत्रपालांची बदली एकाच वेळी झाली. यामुळे या तालुक्यांच्या प्रभारी चार्ज देण्यासाठी जळगाव, चाळीसगाव किंवा इतर तालुक्यांतील वनक्षेत्रपालांची निवड होईल. मात्र, त्यांना त्यांच्या तालुक्याचे काम सांभाळून या तालुक्यात कसे नियंत्रण करता येईल? वृक्षारोपण मोहीम सध्या सुरू आहेत. मागील पन्नास कोटी वृक्षलागवडीच्या वृक्षांचे संगोपन करणे, देखभाल करणे आदी कामांसाठी मनुष्यबळ कोठून आणणार, असा प्रश्‍न आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्य वनसरंक्षक (मुंबई), मुख्य वनसरंक्षक (धुळे) यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Tree planting
जळगावचे गाळेधारक पोहचले नगरविकास मंत्र्याच्या दारी

सामाजिक वनीकरण विभागातील रिक्त पदांबाबत धुळे व नागपूर येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात पत्रव्यवहार केलेला आहे. आता सात पदे रिक्त झाली. यामुळे वृक्षारोपण मोहिमेला ब्रेक बसेल. रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात बोलणी सुरू आहे.
-डॉ. एस. आय. शेख,
विभागीय सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.