जळगावचा सुवर्ण बाजार ठप्‍प; हॉलमार्क सक्ती विरोधात बंद

Jalgaon Gold News: सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात देशभरात बंद पुकारला आहे.
 Jalgaon Gold Market
Jalgaon Gold Market
Updated on


जळगाव : सोन्याच्या दागिन्यांसाठी (Gold jewelry) हॉलमार्किंगचा (Hallmarking) नियम अनिवार्य केला आहे. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (Unique identification) नंबरची सक्ती केली आहे. या विरोधात सराफ व्‍यावसायिकांनी बंद (Gold business closed) पुकारला आहे. यामुळे जळगावातील सुवर्ण बाजारातील उलाढाल ठप्‍प झाली आहे.

 Jalgaon Gold Market
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक..दोन युवकांचा जागीत मृत्यू


जळगावात आज सुवर्ण व्यवसायिकांतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात देशभरात बंद पुकारला आहे. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती ही करण्यात येऊ नये; अशी मागणी सराफ व्यवसायिकांची आहे. हूडनुसार सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार सोने– चांदी आहे. त्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सराफा असोसिएशनचे बंद पुकारला आहे.

 Jalgaon Gold Market
बहिणीने राखी बांधली पाहुणचार केला..आणि वाटेत भावाचा अपघात झाला

जिल्‍ह्यातून दोन हजार व्‍यावसायिकांचा बंद
सराफ व्‍यावसायिकांनी पुकारलेल्‍या बंदमध्‍ये जळगाव शहरातील १५० तर जिल्हाभरातील २ हजार सराफा व्यवसायिकांतर्फे बंद ठेवण्यात आला आहे. यात अध्यक्ष गौतम लुनीया, उपाध्यक्ष अजय ललवाणी, सचिव स्वरुप लुंकड यांच्या माध्यमातून सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()