मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!

संघटनेतर्फे एकूण बारा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!
Updated on


जळगाव ः शेतकरी (Farmer)विरोधी कायदे रद्द करा, रद्द करा.. रद्द करा., ‘कामगार विरोधी कायदे रद्द करा’, ’खाद्य तेलाची दरवाढ रद्द करा.., ‘हम सब एक है’, मोदी सरकार मुर्दाबाद ... मुर्दाबाद, शेतकरी विरोधी सरकार मुर्दाबाद.. ‘कामगार कष्टकरी संघटनेचा विजय असो, डावी आघाडी जिंदाबाद, डावी आघाडी झिदांबाद, महागाई कमी करा, कमी करा, मराठी शाळा सुरू कर, अंगणवाड्या सुरू करा, लाल झेंडयाचा विजय असो, हम सब एक है...’ अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाचा (Collector's Office) परिसर दणाणून गेला होतो. निमित्त होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (India Communist Party )भाववाढी विरोधातील आंदोलनाचे (Movement).( india Communist party movement against inflation)

मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!
जिद्दीपुढे नियतीही झुकली; आईच्या कष्टाचे मुलाने केले चीज

संघटनेचे अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली धरणे झाली. लक्ष्मण शिंदे, शांताराम पाटील, गोरख वानखेडे, छोटू पाटील, हिराबाई सोनवणे, वासूदेव कोळी, बळीराम ढिवर, यमुनाबाई धनगर, प्रमिला धनगर, मंगला कुमावद, लताबाई धनगर आदींनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले!
दीपनगरचे दोन संच पुन्हा कार्यान्वित; राज्यात विजेची मागणी वाढली!

संघटनेतर्फे एकूण बारा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यात नवीन कामगार कायदे रद्द करावे, आदीवासींसाठी खावटी योजना सुरू करा, जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू कराव्यात, कोविड काळात शेतकरी, शेतमजूर, व्यावसायीक यांच्या खात्यावर दरमहा साडेसात हजार टाकावेत, भुमिहीन, शेतमजूर शेतकरी विधवा, घटस्फोटीता, दिव्यांग यांना वयाची कागदपत्रे जिल्हा रुग्णालयातून मिळावी, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेत दरमहा पाच हजार मिळावे, कोवडची लस घरोघरी जावून द्यावी, पेट्रोल डिझेल, साखर, खाद्यतेल दरवाढ त्वरीत रद्द करावी आदी मागण्यांचा सामावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.