जळगाव : राज्यात तमाशाचे (Tamasha) सर्वाधिक फड खानदेशात (Khandesh) होते व आजही आहेत. दुर्दैवाने तमाशासारख्या लोककलेला खानदेशात हवी तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. यांसह अन्य लोककलांना वाहून घेतलेले खानदेशातील पाच हजार कलावंत (Folk artist) प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि आर्थिकदृष्ट्याही उपेक्षित राहिल्याचे वास्तव अधोरेखित होत आहे.
दीड वर्षापासून कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे लॉकडाउन व सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवांवरील बंदीमुळे लोककलावंतांची उपासमार होत आहे. राज्यभरातील अशा अडचणीतील लोककलावंतांसाठी शासनाचे सांस्कृतिक धोरण तयार होत असून, प्रत्यक्ष कलावंतांपर्यंत मदत पोचण्यासाठी आणखी बराच काळ जाऊ द्यावा लागेल.
खानदेशचा मोठा वारसा
खरंतर खानदेशला लोककलांची समृद्ध परंपरा लाभली आहे. तमाशा व अन्य लोककलांबाबत पश्चिम महाराष्ट्राचा बोलबाला असला, तरी प्रत्यक्षात खानदेशला त्याचा मोठा वारसा लाभला आहे. राज्यात सध्या पूर्णवेळ कार्यरत तमाशाच्या २५ ते ३० फडांपैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात नऊ, तर खानदेशात १६ फड आहेत. विठूबाई नारायणगावकर, आनंद लोकनाट्यपासून सुरवात करणाऱ्या रघुबाई खेडकर यांसारख्या विख्यात तमाशा कलावंतांना खानदेशातील तमाशाचा वारसा आहे. खानदेशातील पारंपरिक व विख्यात वहीगायन लोककला सादर करणारी ७०- ८०, शाहिरी सादरकरणातील १५, वाघ्या-मुरळी गोंधळाची ६० अशी पथके खानदेशात आहेत.
...तरीही कलावंत उपेक्षित
एकीकडे खानदेशी लोककलांना असा अनेक वर्षांचा वारसा व परंपरा तसेच संख्याही अधिक असताना या लोककला नेहमीच उपक्षित राहिल्या आहेत. आपल्याकडे तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्याप बदललेला नाही. त्यामुळेही खानदेशात तमाशाला सर्वमान्यता मिळाली नाही, असे असतानाही खानदेशी तमाशा फडांनी राज्य गाजविल्याची उदाहरणे आहेत.
प्रयत्न सुरू
कलावंत उपेक्षित राहत असल्यामुळे आणि दीड वर्षातील कोरोनाकाळ सर्वच क्षेत्रांसाठी खूपच संघर्षाचा असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम लोककलांवरही झाला आहे. त्यामुळे या एकूणच स्थितीने लोककलांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे पाहून काही लोककलाप्रेमी आणि या कलांसाठी समर्पित व्यक्ती लोककलावंतांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांनी एक आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.