जळगाव : गोरगरीब जनतेचे सिव्हिल हॉस्पिटल अशी ओळख असलेले (Jalgaon medical collage and hospital) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने स्वतःची ओळख वर्षभरात बदलवली असून येथील सुशोभीकरण आणि स्वच्छता आता जागतिक पातळीवर पोहचली आहे. जागतिक संस्थेने दिलेल्या या बहुमानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे जळगावचा नावलौकिक वाढला आहे, असे गोरवाद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister gulabrao patil) यांनी काढले. (jalgaon-medical-collage-award-from-face-india-world-record)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छता, सुशोभीकरण व रंगरंगोटीची दखल घेऊन जागतिक पातळीवर फेस इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेने "फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड" हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. सुशोभीकरणासाठी ज्या कलाकार व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांना आज पालकमंत्री पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.
भिंत रंगविली
जागतिक पातळीवर फेस इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेने "फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड" हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. रुग्णालयात एकूण १०.१९९ चौरस फूट भिंत रंगवण्यात आली आहे. प्रमाणपत्रावर संस्थापक व अध्यक्ष वीरेन लोटस यांची स्वाक्षरी आहे.
यांचा झाला सन्मान
कलाकार प्राचार्य डॉ. अविनाश ज् काटे, प्रा. डॉ. वैशाली काटे, हर्षल कदम, सत्यनारायण पवार, प्रविणसिंग पाटील, कंत्राटी कर्मचारी राहुल सपकाळ, आरिफ पठाण, प्रमोद कोळी, लक्ष्मण मिस्तरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी प्रकाश सपकाळ, राकेश सोनार, अनिल बागलाणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय गायकवाड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.