सलग चौदा दिवस मृत्यूशी झुंज;आणि 'मोहन' चालत गेला घरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्यानंतर त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
Government Medical College and Hospital
Government Medical College and Hospital
Updated on
Summary

श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच खाजगी दवाखान्यात उपचार होत नसल्याने २२ जुलै रोजी पहाटे ४. ३० वाजता दाखल झाला होता.


जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Government Medical College and Hospital) मृत्यूच्या दाढेतून ११ वर्षीय बालकाला वाचविण्यात अतिदक्षता आणि बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाला यश आले आहे. कोरोनाविरहित (Corona Free) रुग्णांसाठी रुग्णालय खुले झाल्यानंतर दाखल होणारा या पहिल्या रुग्णास अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद (incumbent Dr. Jaiprakash Ramanand) यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. अतिदक्षता विभागात (Intensive care unit) मरणाशी झुंज देऊन स्वतःच्या पायावर चालत हा ११ वर्षीय मुलगा यशस्वी उपचार मिळाल्याने घरी गेला आहे.

Government Medical College and Hospital
चक्क..आई वडीलांचेच स्मृती मंदिर बनवले शेतात!


मोहन सुरेश गोपाळ (वय ११, रा. वावडदा ता. जळगाव) याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच खाजगी दवाखान्यात उपचार होत नसल्याने २२ जुलै रोजी पहाटे ४. ३० वाजता दाखल झाला होता. याच दिवशी रुग्णालय देखील कोरोनाविरहित उपचारांसाठी घोषित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्यानंतर त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याचा ऑक्सिजन ६५ ते ७५ असा होता. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी विविध तपासणी केली. त्यात त्याला मिस-सी (मिस्क) हा आजार व सोबत न्यूमोनिया असल्याचे निदान झाले.

चौदा दिवस झुंज

मोहनला सलग ५ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती पूर्वपदावर आली. त्यानंतर त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली बालरोग कक्ष क्रमांक ४ येथे दाखल करण्यात आले. तब्बल १४ दिवस उपचार झाल्यावर त्याची प्रकृती बरी झाली. स्वतःची कामे स्वतः करायला लागला. त्यामुळे मोहनला अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

या टिम ने केले उपचार
मोहनवर बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. विश्वा भक्ता, डॉ. नीलांजना गोयल यांनी उपचार केले. तर त्यांना अतिदक्षता विभागाच्या इंचार्ज अधिपरिचरिका माया सोलंकी, बालरोग विभागाच्या इन्चार्ज सिस्टर संगीता शिंदे, अधिपरिचारिका अर्चना भास्कर, जयश्री पाटील, दीपमाला भैसे, सविता सामुद्रे, तुळसा माळी, नीलम पाटील, कल्पना मांजरेकर यांनी सहकार्य केले.

Government Medical College and Hospital
घराच्या छतावर छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला मृत अर्भक


बालकाने मानले आभार
अकरा वर्षीय मोहनला रुग्णालयातून निरोप दिला तेव्हा त्याने अधिष्ठातांचे पाया पडून आशीर्वाद घेऊन उपचाराबद्दल आभार मानले. मोहनच्या परिवाराने देखील रुग्णालय प्रशासन व बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.