जळगाव ःयेथील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) (Jalgaon hospitals and medical colleges) आज ‘डीन’च्या खुर्चीवरून मोठा किस्सा घडला. पदभार मिळालेला नसताना मीच ‘डीन’ असे सांगत डॉ.मिलींद फुलपाटील यांनी सकाळीच डीन’च्या खूर्चीचा ताबा घेतला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व स्टाफही चक्रावला आहे. ‘डीन’ (Dean) म्हणून कोण ? डॉ.रामानंद की डॉ.फुलपाटील असा किस्सा दिवसभर चर्चेत राहिला.
येथील ‘जीएमसी’ मध्ये २६ ऑगस्टला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जळगावच्या ‘डीन’पदी नागपूरच्या शरिर रचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.मिलींद फुलपाटील यांची जळगावला शरिर रचना शास्त्र विभागात बदली करून डीन पदाचाअतिरिक्त कार्यभार सोपविला होता. जळगावचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सव्वा वर्षाचा कालावधी झाल्याने त्याच्या बदलीला शहरातील अनेक संघटनांनी विरोध दर्शविला होता.
नियूक्तीचे पद रिक्त..
दरम्यान ७ सप्टेंबरला डॉ.फुलपाटील हे जळगावला येवून पदभार घेवू लागले असता, शरिर रचना शास्त्रविभागात प्राध्यापकाचे रिक्त पद नसल्याने ते चार दिवस थांबून होते. त्यांच्या नियूक्तीचे पद रिक्त नसल्याने डीन रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला तसे कळविले होते. त्यावर मार्गदर्शनही मागविले होते.
आणि खूर्चित जाऊन बसले..
दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान शासकीय सुटी असल्याने त्यांनी सुटी टाकून तसा पत्रव्यवहार वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या सचिवांना केला होता. याच कालावधीत डीन डॉ.रामानंदही शासकीय सुटी असल्याने गावी गेले होते. आज सकाळी दहालाच डॉ.फुलपाटील हे डीन’ डॉ.रामानंद यांच्या खूर्चीत जावून बसले. मी आजपासून कार्यभार पाहत असल्याचे त्यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळविले.
नविन डिन पदभार घेतल्याने एकच धावपळ
जसे ते खुर्चीत जावून बसले रुग्णालयात एकच धावपळ उडाली. नवीन डीनने पदभार घेतला. जून्या डीनचे काय ? कोणाचे ऐकावे असा सूर महाविद्यालयात उमटला. दरम्यान डॉ.रामानंद यांना त्यांच्या खूर्चीत डॉ.फुलपाटील जावून बसल्याने त्यांनी कार्यालयात न जाता रूमवरच थांबणे पसंत केले. डॉ.फुलपाटील यांनी डीन पदाच्या खूर्चीचा ताबा घेतल्याने त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाल कळविले.
अनेकांची डॉ.फुलपाटील यांना विचारणा
अनेक सामाजीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब कळल्यानंतर ते डॉ.फुलपाटील यांच्या कॅबीनमधये जावून तुम्ही आजच कसे या खूर्चीवर बसले. तूमच्या जागेचे पद रिक्त नाही मग कार्यभार कसा घेतला असे एक ना अनेक प्रश्न विचारू लागला. डीनच्या पदावर असताना असे प्रश्न थेट विचारले जात असल्याने डॉ.फुलपाटील यांनी सिक्यूरीटी गार्डला बोलावून दोन गार्ड कार्यालयाबाहेर बंदोबस्तासाठी बसविले. दिवसभर याच प्रकाराची चर्चा होती.
मला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांनी आर्डर दिली आहे. त्याचे मी पालन करीत आहे. ७ सप्टेंबरला मी आलो मात्र डीनचा पदभार मिळाला नाही. आज पदभार मी शासनाने दिलेल्या पत्राप्रमाणे घेतला आहे.
डीन डॉ.मिलिंद फुलपाटील
डॉ.फुलपाटील यांनी आज थेट माझ्या खूर्चीचा ताबा घेतला. त्याबाबत मी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालकांना कळविले आहे. त्यांनी दोन दिवस (बुधवारपर्यंत) वाट पहा असे सांगितले आहे. यामुळे मी रुमवरच आहे.
डीन डॉ.जयप्रकाश रामानंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.