जळगावात म्युकोरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया; महिलेला जीवदान

जळगावात म्युकोरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया; शेतमजूर महिलेला जीवदान
surgery for mucormycosis jalgaon medical collage
surgery for mucormycosis jalgaon medical collagesakal
Updated on

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनासदृश व म्युकोरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या शेतमजूर महिलेवर पहिली शस्त्रक्रिया (surgery for mucormycosis) यशस्वीपणे झाली. अत्यंत गुंतागुंतीची आणि चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत महिलेचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. (medical-coolage-first-surgery-for-mucormycosis-in-Jalgaon)

surgery for mucormycosis jalgaon medical collage
जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्येतील घट कायम; संख्या दोनशेच्या आत !

कोल्हे (ता. पाचोरा) या लहानशा गावात पाटील कुटुंब राहते. कर्तापुरुष पक्षाघाताने घरीच असतो. महिला दुसऱ्या शेतात जाऊन मजुरी करते. पाटील दांपत्याची तिन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील मोठी मुलगी कला शाखेच्या द्वितीय वर्षात, तर दोन मुले अनुक्रमे सहावी व पाचवीत आहेत. त्यामुळे घराची जबाबदारी दोन्ही महिलांवरच येऊन पडली. त्यातच ४३ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली. या बाधेतून म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजाराची लागण झाली. परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला २१ मेस दाखल करण्यात आले.

१८ जणांची टीम मिळून शस्‍त्रक्रिया

म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने (Jalgaon medical collage) सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले. त्यानंतर आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक सातमध्ये ठेवण्यात आले. मात्र, शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी आठ विभागांतील प्रत्येकी दोन डॉक्टरांची मिळून शस्त्रक्रियेसाठी १८ जणांची टीम बनवली व शस्त्रक्रिया केली.

surgery for mucormycosis jalgaon medical collage
300 किमी अंतरावरून रसद; आणि कोविड सेंटर चालविणारे भारावले

जबड्याच्या भागावर शस्‍त्रक्रिया

म्युकोरमायकोसिसच्या या पहिल्याच शस्त्रक्रियेत या ४३ वर्षीय महिलेचा वरचा जबड्याच्या भागावर शस्त्रक्रिया करून काळी बुरशी काढून टाकण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच ही शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. महिलेला द्रवपदार्थाद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पाडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली.

कोरोनासदृश आजार व त्यात म्युकोरमायकोसिस झाल्यामुळे पाटील कुटुंब चिंतित होते. मात्र, त्यांना धीर देत संबंधित महिलेचा शस्त्रक्रियेद्वारे जीव वाचविला आहे.

-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्‍ठाता, शासकिय वैद्यकिय रूग्‍णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()