शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रस्तावित जागा मौजे चिंचोली (ता. जळगाव) येथे असून, तेथे भव्य इमारत बांधण्यात येणार आहे.
जळगाव : चिंचोली (ता. जळगाव) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (Government Medical College and Hospital) प्रस्तावित जागा आहे. याबाबत बुधवारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये खात्याचे मंत्री अमित देशमुख (Medical Education Minister Amit Deshmukh) यांनी ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीत बांधकामाबाबत स्थापत्य व विद्युतकामांची वेगवेगळी अंदाजपत्रके व नकाशे (Estimates and maps) देण्याचे निर्देश मंत्री देशमुख यांनी दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, कार्यकारी अभियंता जी. एच. राजपूत, एचएससीसी कंपनीचे जनरल मॅनेजर नरेंद्र उपाध्याय, उपजनरल मॅनेजर श्यामसुंदर मिडडा, सहाय्यक अभियंता सुभाष राऊत आदी उपस्थित होते.
चिंचोलीत होणार हब
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रस्तावित जागा मौजे चिंचोली (ता. जळगाव) येथे असून, तेथे भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचा सुधारित प्रकल्प अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर झाला आहे. बांधकामासाठी राज्य शासनाने एचएससीसी कंपनीला सल्लागार म्हणून नेमले असून, त्याबाबत चाचपणी सुरू आहे.
दोन टप्प्यांत काम
पहिला टप्पा ६६७, तर दुसरा टप्पा ४५० कोटी रुपयांचा असेल, असे स्पष्ट केले आहे. यातील पहिल्या टप्प्यात मेडिकल कॉलेजची मुख्य वास्तू, ६५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वसतिगृह, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, लायब्ररी, संलग्नित रुग्णालये आणि अन्य सुविधांच्या इमारती व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
डीपीआर तयार
याला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार दिल्लीच्या एचएससीसी कंपनीची नेमणूक केली आहे. या कंपनीने संबंधित सर्व वास्तूंचे नकाशे, अंदाजपत्रके आदींयुक्त डीपीआर तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा डीपीआर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द करण्याचेही सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार, बांधकाम खासगी प्रकल्पातून करण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या किमतीच्या १.२५ टक्के रक्कम म्हणजे १३ कोटी ८५ लाख रुपये शासनाकडे जमा करण्याचे कळविले आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्याबाबत सामंजस्य करार झाला आहे, त्याची मुदत संपली असून, त्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. त्याला लवकर मान्यता द्यावी, म्हणून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी मंत्री देशमुख यांना विनंती केली. मंत्री देशमुख यांनी सचिवांना कार्यवाहीबाबत आदेश दिले. सध्याची स्थिती लक्षात घेऊन तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या २०२१ मध्ये बदल्या करू नयेत, अशी मागणी मंत्री पाटील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.