जळगाव ः एमआयडीसी मधील आर्गेनिक खते (Organic fertilizers) तयार करणारी समृध्दी केमिकल कंपनीत (Chemical Company) आज सकाळी एका कुंडातील गाळ काढत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू (Workers suffocated death) झाल्याची घटना घडली. एक जण गाळात (mud) अडकला, त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला आणि दुसरा देखील गाळात अडकला, तिसरा दोघांना वाचविण्यासाठी गेला आणि तो ही गाळात अडकून तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
(jalgaon midc Organic fertilizers Chemical Company accident three workers suffocated death)
जळगाव औद्योगीक वसाहतीमधील आर्गेनिक खते तयार करणारी समृध्दी केमिकल कंपनी आहे. कंपनीला तीन दिवस सुट्टी होती. तिन दिवसानंतर रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी ३० चिंचोली या. यावल, दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) तिन्ही कामगार आज नेहमी प्रमाणे कंपनीत आले.
एकमेकांना वाचविण्यासाठी गेले आणि..
कंपनीतील अंडरग्राऊंड टाकीमध्ये गाळ साचला होता. हा गाळ साफ करण्याचे तिन्ही कामगारांना सांगण्यात आले होते. यानुसार त्यांनी सफाईला प्रारंभ केला. यात पहिल्यांदा दिलीप गाळात अडकला. त्याला सोडविण्यासाठी हे दोन्ही जण गेले असता ते देखील यात अडकले. यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
खत तयार करण्याची कंपनी
जळगाव एमआयडीसी मधील समृध्दी केमिकल्स ही कंपनी ऑर्गेनिक खते आदी वस्तू तयार करणारी कंपनी आहे. रमजान, अक्षय तृतीया सण असल्याने गेल्या तीन दिवसापासून कंपनीला सुट्टी होती. .त्यामुळे अंडरग्राऊंड टाकीत प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्यासाठी आज सकाळी सुरवात झाली आणी अशी दु्र्दैवी घटना घटली.
पोलिस अधिक्षकांनी केली पाहणी
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांसह भेट दिली. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधिक्षकांनी प्रत्यक्षदर्शी कामगारांकडून घटना कशी घडली याबाबत माहिती जाणून घेतली. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.