शेतकऱ्यांना कर्जासह खते, बियाणे वेळेवर द्या !

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
farmer
farmerfarmer
Updated on



जळगाव ः पारंपरिक शेतीकडून (Traditional farming) आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरिपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे मिळावे, तसेच खते व पीककर्ज (crop loan) वेळेवर उपलब्ध होईल याकरिता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. बोगस बियाणांची ( Seeds) विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिल्या.


( minister gulabrao patil information farmers provide timely fertilizer seeds loans)

farmer
राज्यातील ७७ हजार शाळा ‘यू-डायस प्लस ऑनलाइन’मध्ये सज्ज

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुराव्याचे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे आदी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री शिरीष चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे आदी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

farmer
दिलासादायक ! जळगावची पॉझिटिव्हिटी राज्यात सर्वांत कमी

शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा

पालकमंत्री पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करावा. एकाच पिकावर विसंबून न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपीक घ्यावे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलल्या बियाणे, खतांचे पक्के बिल विक्रेत्याकडून घ्यावे. सदरचे बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा. शेतकऱ्यांनी शक्यतो धुळ पेरणी करू नये, तर बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

farmer
धुळ्यात टॉसीलीझुमॅबचा काळाबाजार; इंजेक्शन विकणारे अटकेत


जिल्ह्यात २६४ कोटींचा कर्जपुरवठा

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ४१.८९ कोटी, तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत २२१.५४ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे याकरिता शेतीशाळा घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन असून, गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी खरीप हंगामाच्या बैठकीत दिली. जिल्ह्यात कपशीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी या वर्षी मका पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, तृणधान्य व गळीत धान्याचे क्षेत्र वाढणार आहे. जिल्ह्यात २६ लाख ५२ हजार ६०० पाकिटे कपशी बियाण्यांचे नियोजन असून, एक लाख ३३ हजार टन खतांचा साठा उपलब्ध आहे. शिवाय ११ हजार ९४५ टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ‘विकेल ते पिकेल’. या वर्षी जिल्ह्यात बी-बीयाणे, खतांची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

(minister gulabrao patil information farmers provide timely fertilizer seeds loans)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.