जळगाव : शरद पवार (Sharad Pawar) शेतकऱ्यांचे (Farmers) नव्हे तर साखरसम्राट व कारखानदारांचे (Sugar factory) नेते आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी (FRP) मिळू न देण्याचा कुटिल डाव खेळत आहेत. त्यांच्या तोंडात राम आणि बगलेत सुरा असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी (MLA Sadabhau Khot) जळगावात पत्रकार परिषदेत केली.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाले. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. या वेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, की शेतकऱ्यांचा खजिना कसा लुटायचा यात शरद पवार तरबेज आहेत. शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून एकरकमी एफआरपी मिळण्याची तरतूद होती. मात्र ती टप्प्यात देणे गरजेचे असल्याचे सांगून ६०; २०; २० असे तीन टप्पे करण्यात आले आणि हे सर्व केंद्र सरकारने ठरविले, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. शरद पवार यांनी ही चाल खेळली ती केंद्राच्या लक्षात आली नाही.
आम्ही मात्र आता शरद पवार यांचा हा शेतकरीविरोधी आणि कारखानदारांच्या हिताचा डाव उधळून लावणार असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले. शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहोत. राज्यात शेतकऱ्यांची ३२० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ही एफआरपी चुकती करावी, त्यानंतर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा, अन्यथा त्यांच्यावर एफआयआर दाखल करून साखर जप्त करून त्याचा लिलाव करून त्यातून शेतकऱ्यांना रक्कम द्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
कोरोनाकाळात दिलासा नाही
दोन वर्षांच्या कोरोनाकाळात राज्य सरकारने कोणताही दिलासा दिला नाही, असा आरोपही खोत यांनी केला. ते म्हणाले, की शेजारच्या राज्यांनी रिक्षावाले, वडापाव विकणारे यांना मदत केली. मात्र राज्यातील सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नाही; उलट या काळात कर्जबाजारी दवाखाने कर्जमुक्त झाले आणि रुग्ण कर्जबाजारी झाले. अगदी महात्मा फुले योजनेचा फायदाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. या काळात शासन पूर्ण निष्क्रिय होते, असा आरोपही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.