श्री विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून मुक्ताई पालखी माघारी

Muktaibai's Palkhi : आषाढी एकादशीला शेकडो वर्षांची परंपरा जपत मुक्ताईची पालखी कोरोनाचे नियम पाळत पंढरपुरला गेली होती.
Muktaibai's Palkhi
Muktaibai's Palkhi Muktaibai's Palkhi
Updated on

जळगाव : पंढरपुरात (Pandharpur) दर वर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर येथून मुक्ताईबाईची पालखी (Muktaibai's Palkhi) जात असते. यंदा देखील आषाढी ए‌कादेशीला (Ashadhi Ekadeshi) जावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी झाला. तर आज सकाळी गोपाळकाला व काल्याचे कीर्तन होवून भगवान श्रीविठ्ठल दर्शन घेवून पालखीने निरोप घेऊन दुपारी माघारी मुक्ताईनगर निघाली.

(muktaibais palkhi returns from pandharpur to muktainagar)

Muktaibai's Palkhi
Muktaibai's Palkhi

आषाढी एकादशीला शेकडो वर्षांची परंपरा जपत मुक्ताईची पालखी कोरोनाचे नियम पाळत पंढरपुरला गेली होती. शुक्रवारी मुक्ताबाई पादुकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेकपूजा करून साडीचोळी अर्पण संत ज्ञानेश्वरांकडून देण्याचा सोहळा झाला. आज पालखी मुक्ताईनगरला परत येण्याचा सोहळा झाला. सकाळी सहाला गोपाळपूर येथे ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले. तसेच भगवान श्रीविठ्ठल दर्शन व निरोप घेऊन दुपारी पालखी माघारी मुक्ताईनगर निघाली. रविवारी (ता. २५) पहाटे चारपर्यंत पालखी सोहळा नवीन मंदिरात, मुक्ताईनगर येथे पोचेल.

Muktaibai's Palkhi
Muktaibai's Palkhi

गेल्या पाच दिवसापासून पंढरपुरात मुक्ताईचे पालखी असून गुरूपौणीमेला विठ्ठलाचे सर्व वारकरीचे दशर्न झाल्याचा आनंद सर्व वारकऱ्यांना आहे. मुक्ताईला साडीचोळी देण्याचा सोहळा झाला असून आज मुक्ताईकडे विठ्ठलाचे दर्शन घेवून पालखी निघाली आहे. विठ्ठलाकडे कोरोना जावून सर्व वारकऱ्यांना पुढील वर्षी पायी दर्शनासाठी येवू देण्याचा साकडे घातले असल्याचे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी माहिती दिली. यावेळीविश्वस्त शंकरराव पाटील, निळकंठराव पाटील, पंजाबराव पाटील, उद्धव जुनारे महाराज, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील, आदी भाविक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.